पुणे : वारकर्यांच्या प्रवासात सहकार्य करण्याच्या उद्देशाने आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल ने मोफत आरोग्य चिकित्सा शिबीराचे आयोजन केले होते आहे. आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या समर्पित अशा वैद्यकीय टिम ने विविध सेवांसह रक्तदाब आणि शर्करा तपासणी सह प्रथमोपचार, सल्लामसलत आणि औषधांचे वाटप केले आहे.
आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या या उपक्रमाअंतर्गत १५० हून अधिक रुग्णांची तपासणी केली आणि ज्या रुग्णांना अधिक काळजीची गरज आहे अशा १० रुग्णांना आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या समूहाने सुरक्षित पणे आकुर्डी येथील सरकारी रुग्णालयात मेडिकल सपोर्ट ॲम्ब्युलन्स च्या माध्यमातून भर्ती केले.
हा उपक्रम म्हणजे पालखी सोहळ्यात आरोग्य सेवा देण्याच्या आमच्या सामाजिक बांधिलकीचा भाग आहे. वारकर्यांच्या या पवित्र अशा वारीमध्ये त्यांच्या आरोग्या विषयक कल्याणात हातभार लावण्याची संधी मिळाल्या बद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.