भारतातील शास्त्रशुद्ध आयुर्वेदिक उत्पादनांची निर्मिती करणा-या आघाडीच्या डाबर कंपनीने आज डाबर लाल बाम बाजारात दाखल झाल्याची घोषणा केली. ‘अल्ट्रा स्ट्रॉंग’ डाबर लाल बाम डोकेदुखी, अंगदुखी आणि सर्दी यापासून त्वरित आराम देणारा इलाज आहे.
डाबर इंडिया च्या ओव्हर द काउंटर हेल्थकेअर व्यवसायाचे मार्केटिंग विभाग प्रमुख श्री अजय सिंग परिहार म्हणाले, “ नित्याच्या आरोग्यविषयक समस्यांवर नैसर्गिक आणि परिणामकारक इलाज उपलब्ध करून देण्यासाठी डाबर कटिबद्ध आहे आणि डाबर लाल बाम हे त्याचे द्योतक आहे. हा नवा शक्तीशाली बाम तीव्र डोकेदुखी, अंगदुखी आणि सर्दी यापासून आराम देण्यासाठीच्या खास ‘थ्री इन वन’ फॉर्म्युला वापरुन तयार करण्यात आला आहे. हा शक्ति शाली फॉर्म्युला इतर बाम च्या तुलनेत १.४ पट जास्त आराम देत असल्यामुळे तो तीव्र वेदनांवर प्रभावी इलाज आहे. शिवाय, डाबर लाल बाम त्वरित काम करतो आणि तो लावल्या पासून काही सेकंदांत वेगवान आणि प्रभावी आराम देतो, ज्याची आपल्याला फार गरज असते.”
डाबर लाल बाम रु. ५० किमतीच्या १.६ मिलि. च्या पॅक मध्ये उपलब्ध आहे. दैनंदिन जीवनात उद्भवणा-या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठीचा तो एक प्रभावी आणि सर्वांना परवडेल असा इलाज आहे. तो देशभरात सर्व किरकोळ दुकानांत तसेच इ कॉमर्स वेबसाइट वर उपलब्ध असेल.
“ डाबर लाल बाम वेदनांपासून उत्तम प्रकारे आराम मिळवून देतोच, शिवाय तो आयुर्वेदातील मूल्यवान तत्त्वांनुसार तयार केला असल्यामुळे ग्राहकांसाठी एक नैसर्गिक आणि सुरक्षित इलाज आहे. ज्यांना वेदनांपासून त्वरित आणि खात्रीशीर इलाज हवा असेल ते डाबर लाल बाम चीच निवड करतील याबद्दल आम्हाला विश्वास आहे,” असेही श्री परिहार म्हणाले.
डाबर इंडिया विषयी :
डाबर इंडिया लिमिटेड ही भारतातील आघाडीच्या ग्राहकोपयोगी उत्पादने निर्मिती करणा-या कंपन्यांपैकी एक आहे. आपल्या १४० वर्षांच्या परंपरेच्या आधारावर व्यवसाय करणारी डाबर ही भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह कंपनी असून आयुर्वेदिक आणि नैसर्गिक तत्वावर आधारित उत्पादने उपलब्ध करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. डाबर इंडिया च्या ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या यादीत पुढील ८ आघाडीचे ‘ब्रॅंड’ आहेत – डाबर हनी (मध), डाबर हनीटस, डाबर पुदीन हरा, डाबर लाल तेल, डाबर आमला, डाबर रेड टुथपेस्ट आणि रिअल हे फळांचे रस.