26.6 C
New Delhi
Tuesday, July 15, 2025
Homeआरोग्यतरुणांमधील अचानक हृदयाघाताने होणारा मृत्यू वाढता आणि खरा धोका - डॉ. जगदीश...

तरुणांमधील अचानक हृदयाघाताने होणारा मृत्यू वाढता आणि खरा धोका – डॉ. जगदीश हिरेमठ

पुणे, : तरुण व्यक्तीचा अचानक हृदयाघाताने होणारा मृत्यू (सडन कार्डियाक डेथ- एससीडी) ही लक्षणीय प्रमाणातील सार्वजनिक आरोग्य समस्या होत आहे. वैद्यकीय तंत्रज्ञानातील प्रगती आणि हृदयविकाराच्या स्थितीची समज वाढली तरी उत्तम आरोग्य असल्यासारखे वाटत असलेल्या व्यक्तींचा प्राण घेण्याचा धोका कायम आहे. पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमधील कॅथ लॅबचे संचालक डॉ. जगदीश हिरेमठ यांनी जागतिक हृदय आरोग्य दिवस २०२४ निमित्त ही माहिती दिली.

ते म्हणाले, की सामान्यपणे एखादी तरुण व्यक्ती जिमच्या ट्रेडमिलवर किंवा व्यायाम करताना किंवा अधिक वेळ नृत्य किंवा पोहताना कोसळते. या अचानक हृदयाघाताने होणारे मृत्यू सहसा रुग्णालयाच्या बाहेर घडतात आणि तातडीची कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन (सीपीआर) दिले नाही तर प्राण जाऊ शकतो. पहिल्या काही मिनिटांमध्ये सीपीआर देण्यासाठी केवळ बघे किंवा साक्षीदार हजर असतात. त्यामुळे सीपीआर आणि एईडी शॉक मशिनचे ज्ञान समाजातील १५ वर्षांखालील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे.

सर्वसामान्यपणे मानले जाते तसे अशा प्रकारे कोसळणे हे प्रत्येक वेळेस हृदयविकाराचा झटका नसते. हृदयविकाराचा झटका हा कोरोनरी धमन्यांमध्ये निर्माण झालेला अडथळा असते. अचानक हृदयाघाताने होणारा मृत्यू म्हणजे हृदयाचे अचानक विद्युत यंत्रणा निकामी होणे असते. हृदयाचा ठेका अचानक थांबतो किंवा ३०० / मिनिटांपेक्षा अधिक होतो आणि निकामी होतो. या दोन्ही प्रकारांमध्ये शरीरासाठी हृदयातून बाहेर पडणारे रक्त थांबते आणि त्या व्यक्तीला काही मिनिटांमध्ये पुनर्जीवित नाही केले तर त्या व्यक्तीचा जीव जाऊ शकतो.

एक उत्तम सीपीआर आणि एईडी मशिनच्या वापरामुळे अचानक हृदयाघाताने होणाऱ्या १० मृत्यूंपैकी ६ ते ७ वाचविले जाऊ शकतात. सिएटलसारख्या ठिकाणी ही टक्केवारी १० पैकी ७-८ एवढी जास्त आहे आणि भारतात ती ०.१ टक्के एवढी कमी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

धूम्रपान केले नाही आणि विविध हृदयविकारांसाठी नियमित तपासणी केली तर अचानक होणाऱ्या हृदयविकाराच्या मृत्यूला रोखण्यास मदत होऊ सकते, असे ते म्हणाले. मॅरॅथॉंनमधील धावणे इत्यादींसारख्या कोणत्याही शारीरिक अॅक्टिव्हिटी करण्यापूर्वी उत्तमरीत्या तपासणी करून घेणे आवश्यक असते. अचानक हृदयाघातातून व्यक्ती जीवंत राहिली तर इम्प्लँटेबल डिफायब्रिलेटर्ससारखे प्रगत उपचार उपलब्ध आहेत. जागतिक हृदय आरोग्य दिवस २०२४ निमित्त अचानक हृदयाघाताने होणाऱ्या मृत्यूबाबत आणि अशा हृदयांना कार्डियोपल्मोनरी रिससिटेशनसारख्या शास्त्रीय पद्धतींनी पुनर्जीवित करण्याबाबत जनजागृती वाढविणे अत्यंत आवश्यक आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
26.6 ° C
26.6 °
26.6 °
75 %
4.8kmh
82 %
Mon
26 °
Tue
34 °
Wed
34 °
Thu
34 °
Fri
36 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!