23.1 C
New Delhi
Sunday, March 23, 2025
Homeआरोग्यनामदार चंद्रकांतदादा पाटील यांंच्या वैद्यकीय कक्षामुळे कोथरुडकरांना दिलासा!

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांंच्या वैद्यकीय कक्षामुळे कोथरुडकरांना दिलासा!

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून असंख्य रुग्णांना कोट्यवधीची मदत

पुणे- ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून कोथरुड मधील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून कोट्यावधींची मदत कोथरुड विधानसभा मतदारसंघातील रुग्णांना झाली आहे. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या सेवेमुळे कोथरुड मधील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे.

राज्यातील एकही सर्वसामान्य व गोरगरीब गरजू रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहणार नाही, यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून मदत गरजू रुग्णांसाठी आर्थिक मदत उपलब्ध करुन दिली जाते. या व्यवस्थेमुळे लाखो रुग्णांना संजीवनी मिळाली असून, कोथरुड विधानसभा मतदारसंघातील गरजू रुग्णांना याचा जास्तीतजास्त लाभ व्हावा; यासाठी आपल्या विधानसभा मतदारसंघातील जनसंपर्क कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे.‌

या कक्षाने वेळोवेळी पाठपुरावा करुन कोथरुड मधील असंख्य रुग्णांवर उपचारासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.‌ या कक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत चार कोटी ४२ लाख ७० हजार २५० इतका निधी कोथरूड मधील रुग्णांना उपलब्ध झाला असून, दुर्धर आजारावर उपचार करण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
23.1 ° C
23.1 °
23.1 °
53 %
1kmh
0 %
Sat
26 °
Sun
35 °
Mon
37 °
Tue
39 °
Wed
39 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!