29.1 C
New Delhi
Tuesday, March 18, 2025
Homeआरोग्यपिंपरी चिंचवडमध्ये जापनीज मेंदूज्वर प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

पिंपरी चिंचवडमध्ये जापनीज मेंदूज्वर प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

अवघ्या तीन दिवसांत ३५,००० हून अधिक बालकांचे लसीकरण पूर्ण

पिंपरी : सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे जापनीज मेंदूज्वर (Japanese Encephalitis – JE) प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. १ ते १५ वयोगटातील बालकांसाठी १ मार्च २०२५ पासून सुरू झालेल्या या मोहिमेंतर्गत अवघ्या तीन दिवसांत ३५ हजारांहून अधिक मुलांचे लसीकरण यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहे.

राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत ही मोहीम शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि विशेष लसीकरण शिबिरांमध्ये प्रभावीपणे राबविली जात आहे. शहरातील सर्व मुलांचे शालेय व समाजस्तरावर मोफत लसीकरण केले जात आहे. पालक या मोहिमेस मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहेत.
…..
चौकट

लसीकरण मोहिमेचा यशस्वी टप्पा

संपूर्ण शहरात राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेत ४ मार्च २०२५ पर्यंत ३५ हजारांहून अधिक बालकांचे जेई लसीकरण करण्यात आले आहे.

रुग्णालयाचे नाव – लसीकरण झालेल्या बालकांची संख्या

आकुर्डी रुग्णालय – ६ हजार २८९

भोसरी रुग्णालय – ५ हजार ३०४

जिजामाता रुग्णालय – ३ हजार २३६

सांगवी रुग्णालय – ४ हजार ५३०

तालेरा रुग्णालय – ४ हजार ७२४

थेरगाव रुग्णालय – २ हजार८०६

यमुनानगर रुग्णालय – ५ हजार ७७८

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय – २ हजार ३६३


कोट :

‘जेई’ प्रतिबंधक लसीकरण मोहीम केवळ एक लसीकरण उपक्रम नसून आपल्या मुलांच्या उज्ज्वल आणि आरोग्यदायी भविष्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक बालकाला लसीकरण मिळावे, यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाने नियोजन केले आहे. पालकांनी देखील या मोहिमेस सहकार्य करून आपल्या पाल्यांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी या उपक्रमात सक्रीय सहभाग घ्यावा. या मोहिमे अंतर्गत शहरातील सर्व मुलांचे शालेयस्तरावर मोफत लसीकरण केले जात आहे. तरी जास्तीतजास्त नागरिकांनी आपल्या घरातील १ ते १५ वयोगटातील पाल्याला ही लस देऊन घ्यावी.

शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका

कोट

जापनीज मेंदूज्वर हा विषाणूजन्य आजार असून तो प्रामुख्याने १५ वर्षांखालील मुलांमध्ये आढळतो. हा आजार मेंदूच्या मज्जातंतूंवर गंभीर परिणाम करू शकतो. देशातील सार्वजनिक आरोग्य समस्यांपैकी एक म्हणून याकडे पाहिले जाते. या आजारातून ३०-४० टक्के बरे झालेल्या रुग्णांमध्ये आजीवन मज्जासंस्थेशी संबंधित अपंगत्व दिसून येते. त्यामुळे या जीवघेण्या आजारावरील प्रतिबंधात्मक लसीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. पालकांनी आपल्या मुलांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी या लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा व मुलांना जापनीज मेंदूज्वर प्रतिबंधक लस द्यावी.

  • विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका

……
कोट

जापनीज मेंदूज्वर हा एक गंभीर आजार असून, ताप, सतत उलट्या होणे अशी लक्षणे यामध्ये दिसू शकतात. काही प्रकरणांमध्ये मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे या आजारावरील लसीकरण हा एकमात्र सुरक्षित पर्याय आहे. ही लस ९ महिन्यांच्या वयात घेतली असली तरी सध्या सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत ती पुन्हा घेणे आवश्यक आहे. जेणेकरून रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि आजाराचा प्रसार रोखता येईल. पालकांनी आपल्या मुलांचे लसीकरण करून घ्यावे.

  • डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
29.1 ° C
29.1 °
29.1 °
26 %
4.6kmh
0 %
Tue
32 °
Wed
35 °
Thu
36 °
Fri
36 °
Sat
35 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!