पुणे – काही दिवसांपूर्वी पुण्याच्या कोथरुड एरंडवणे भागात दोघांना झिकाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यानंतर आणखी एका रुग्णाला झिकाची लागण झाल्याने पुणेकरांची चांगलीच खळबळ उडाली होती. मात्र आता ही संख्या सहा वर पोहोचली आहे. आतापर्यंत पुण्यातील 6 जणांना झिका विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. झिका व्हायरस बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे पुणेकरांची धाकधुक वाढत चालले असल्याचे दिसून येत आहे. झिकाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विभाग आणि पुणे महापालिका सतर्क झाली आहे.
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एरंडवणे या भागात 28 वर्षीय महिलेला झिका विषाणूची लागण झाली आहे. या गर्भवती महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याआधीही एका गरोदर महिलेला झिका विषाणूची लागण झाली होती. सध्या या दोन्ही गरोदर महिलांची प्रकृती स्थिर आहे. गरोदर महिलांना झिका विषाणूची लागण झाल्याने भ्रूणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, पुण्यात झिका व्हायरस वेगाने पसरत आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सध्या बाधितांची संख्या सहावर पोहोचली आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता पुणे आरोग्य विभाग आणि महापालिका प्रशासन सतर्क झाली असून उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत, असे महानगर पालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी राजेश दिघे यांनी सांगितले.
पुण्यात झिकाचा कहर!
रुग्ण संख्येत आणखी भर
New Delhi
few clouds
28.4
°
C
28.4
°
28.4
°
77 %
2.7kmh
21 %
Wed
38
°
Thu
40
°
Fri
38
°
Sat
36
°
Sun
35
°