पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आणि सूर्योदय फाऊंडेशन मुंबई व ओएनजीसी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील १२५० ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना श्रवणयंत्र वाटप करण्यात आले. सदाशिव पेठेतील फडके हॉल पुणे येथे तीन दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले. राज्यासह पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यातून ज्येष्ठ नागरिक व मुले या शिबीराकरिता आली होती.यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.शिबीरात ४५० ज्येष्ठ नागरिक व ८०० लहान मुलांना श्रवणयंत्र देण्यात आले. आजपर्यंत अनेक रुग्णांना यंत्राचे वाटप करण्यात आले आहे. केवळ पुण्यातच नाही, तर इतरही शहरात या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यावरुनच समाजातील मोठी व्यथा समोर येत असल्याचे दिसून आले आहे. या शिबीरात बार्शी, सोलापूर, धाराशिव यांसह इंदापूर, बारामती, आंबेगाव, जुन्नर, मंचर, भोर, वेल्हा, पिंपरी-चिंचवड आदी भागातील ज्येष्ठ नागरिक व मुलांचा सहभाग होता.ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, मुलांना ऐकायला येत नसेल तर ती केवळ ऐकू शकत नाहीत, असे नाही तर यामुळे अनेक मुले बोलायला देखील शिकत नाहीत. त्यामुळे याकडे लक्ष देऊन श्रवणयंत्र विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येत आहे. लहान मुलांना ऐकायला येत नाही, हे पालकांना लवकर कळत नाही. त्यामुळे याविषयी जनजागृती करण्याकरिता हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जी मुले आर्थिकदृष्टया दुर्बळ आहेत, त्यांना विनामूल्य श्रवणयंत्र दिले जात आहे. तसेच ज्येष्ठांनाही मोफत यंत्र देण्यात आले.
New Delhi
scattered clouds
30.5
°
C
30.5
°
30.5
°
72 %
2.5kmh
46 %
Sat
30
°
Sun
37
°
Mon
32
°
Tue
37
°
Wed
36
°