पुणे – सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या (SSPU) मेकाट्रॉनिक्स अभियांत्रिकी विद्यालयात “मेकाट्रॉनिक्स इन हेल्थकेअर (वैद्यकीय उपकरण उद्योगातील तथ्य)” या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये रॉयल फिलिप्स एनव्ही, नेदरलँड्सच्या सुशील जाधव यांनी वैद्यकीय उपकरण निर्मिती, आरोग्यसेवेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, आणि जैववैद्यकीय उपकरणांतील प्रगतीवर प्रकाश टाकला.कार्यशाळेचे (work shop)प्रमुख आकर्षण म्हणजे, हीलियम-फ्री एमआरआय तंत्रज्ञान या विषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. सुशील जाधव यांनी पारंपरिक एमआरआय प्रणालीतील तांत्रिक अडचणींचा उल्लेख केला, ज्यात सुपरकंडक्टींग मॅग्नेट्स थंड करण्यासाठी लिक्विड हीलियमचा वापर केला जातो. हीलियम हे एक दुर्मिळ आणि महाग संसाधन आहे, ज्यामुळे एमआरआय प्रणालींच्या ऑपरेशनल खर्चामध्ये वाढ होऊ शकते आणि अडचणी निर्माण होऊ शकतात. तथापि, हीलियम-फ्री एमआरआय प्रणाली ह्या समस्येसाठी एक टिकाऊ आणि किफायतशीर उपाय आहेत, कारण त्यामध्ये हीलियमला पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही, आणि या मुळे ऊर्जेचा वापर कमी होतो.
जाधव म्हणाले, “हीलियम-फ्री एमआरआय प्रणालींमुळे वैद्यकीय उपकरण परवडण्याजोगे होईल. कारण ते हीलियमच्या वापरात घट आणेल, सारखं हीलियम भरण्याचा खर्च वगळा जाईल. ह्या प्रणाली केवळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर नाहीत, तर टिकाऊ देखील आहे.कार्यशाळेध्ये आरोग्यामधील मेकाट्रॉनिक्सच्या विस्तृत क्षेत्राची देखील माहिती देण्यात आली, ज्यात औषध वितरण प्रणाली, कृत्रिम अंग, शस्त्रक्रिया, रोबोट्स (ROBOTS)आणि परिधान करण्यायोग्य आरोग्य उपकरणांचा समावेश होता. यामध्ये यांत्रिक, इलेक्ट्रिकल आणि संगणक अभियांत्रिकीच्या एकत्रित ज्ञानाची आवश्यकता आहे, कारण नियंत्रण प्रणाली वैद्यकीय उपकरणांची सुरक्षा आणि विश्वसनीयता सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
मेघा पाटील, वरिष्ठ सहाय्यक प्राध्यापक, मेकाट्रॉनिक्स अभियांत्रिकी विद्यालय, यांनी आपल्या भाषणात वैद्यकीय तंत्रज्ञानातील नवकल्पनांवर जोर दिला. त्यांनी म्हटले, “हीलियम-फ्री एमआरआय तंत्रज्ञान आणि बाजारातील महत्वाचे ट्रेंड या बद्दलचं विस्तृत ज्ञान आमच्या विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरेल. जसे वैद्यकीय उपकरण क्षेत्र विकसित होत आहे, तसे ह्या नवकल्पनांची माहिती असणे हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे.हा कार्यक्रम सागर वानखेडे, सहयोगी प्राध्यापक, आणि हृषिकेश कुलकर्णी, संचालक, मेकाट्रॉनिक्स अभियांत्रिकी विद्यालय यांनी समन्वयित केला होता. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना हेल्थकेअर तंत्रज्ञान क्षेत्रातील करिअरच्या संधींचा शोध घेण्याचा एक मंच मिळाला. कार्यशाळेने नवकल्पनांमध्ये संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन दिले.जसे-जसे उच्च दर्जाच्या वैद्यकीय उपकरणांची मागणी वाढत आहे, तसे-तसे आरोग्य उपायांमध्ये मेकाट्रॉनिक्सच्या तत्त्वांचा समावेश अधिक महत्त्वाचा ठरतो. या सेमिनार कार्यशाळेमधून मिळालेल्या ज्ञानाने विद्यार्थ्यांना येत्या काळातील आरोग्य क्षेत्रातील आव्हानांना तोंड देण्यासाठी योग्यरीत्या सज्ज केले आहे.