26.6 C
New Delhi
Tuesday, July 15, 2025
Homeआरोग्यससुन रुग्णालयातील वर्ग चार मधील कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया आठ दिवसांत

ससुन रुग्णालयातील वर्ग चार मधील कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया आठ दिवसांत

  - वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची विधानसभेत माहिती


पुणे : ससून सर्वोपचार  शासकीय रुग्णालयात 2350 पदे मंजूर आहेत. पण त्यातील 769 पदे  ही रिक्त आहेत. तसेच 156 नसिंगची पद रिक्त आहेत. म्हणजे वर्ग चारची 50 टक्के पद रिक्त आहेत. ही पदभरती  टीसीएस  द्वारा जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने केली जाते. अनेकवेळा यापूर्वी देखील यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे. येत्या आठ दिवसात यासाठी पुन्हा भरती प्रक्रिया राबवण्यासाठी हलचाली केल्या जातील, तसेच वर्ग एक ची 44 आणि वर्ग दोन ची 110 रिक्त पदे तत्काळ भरली जातील अशी माहिती  वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ madhuri misal यांनी विधानसभेत दिली. 

अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 दरम्यान आज विधानसभेत आमदार सुनील कांबळे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार हेमंत रासने, आमदार शरद सोनवणे, आमदार भीमराव तापाकिर आणि आमदार विक्रम पाचपुते यांनी ससून सर्वोपचार  शासकीय रुग्णालया संबंधीत लक्षवेधी प्रश्न मांडला होता. या प्रश्नांना उत्तर देताना वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ बोलत होत्या.

माधुरी मिसाळ म्हणाल्या, ससून रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव रुग्णालय आहे जेथे पुणे, पिंपरी-चिंचवड सह संपूर्ण महाराष्ट्रातून रुग्ण येत असतात. वर्षाला साडे पाच लाख बाह्यरुग्ण येथे येतात. तर पुणे शहरातील जवळपास साठ हजार रुग्ण येथे अॅडमिट असतात. येथे 155 खाटांचा आय सी यु  आहे. मात्र क्षमते पेक्षा जास्त रुग्ण येथे येत असल्याने रुग्णालयांवर अधिकाचा भार पडत आहे.

पुण्यात कॅन्सर हॉस्पिटल उभारणार

कॅन्सरचे वाढते रुग्ण पाहता पुण्यात कॅन्सर हॉस्पिटल canser hospital करण्यासाठी राज्य शासन विचाराधीन आहे. त्यासाठी एम एस आर डी सी   कडे जागेची मागणी देखील करण्यात आली आहे. ससून रुग्णालय sasun hospital ही त्यासाठी योग्य जागा आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली.

12 कोटी 94 लाख रुपयांची औषध खरेदी

ससून शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा होत असल्याची तक्रार होती. या पार्श्वभूमीवर नुकतेच  12 कोटी 94 लाख रुपयांची औषध खरेदी येथे करण्यात आली आहे. तसेच उपकरणांची देखील खरेदी करण्यात आली. तर जिल्हा नियोजन समितीकडे आणखी औषध खरेदीची मागणी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
26.6 ° C
26.6 °
26.6 °
75 %
4.8kmh
82 %
Mon
26 °
Tue
34 °
Wed
34 °
Thu
34 °
Fri
36 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!