19.1 C
New Delhi
Tuesday, January 21, 2025
Homeआरोग्यसूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स कॉलेज ऑफ फिजिओथेरपी विभागात शिरपेचात मानाचा तुरा

सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स कॉलेज ऑफ फिजिओथेरपी विभागात शिरपेचात मानाचा तुरा

पुणे : सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स कॉलेज ऑफ फिजिओथेरपीला इंडियन इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कतर्फे (आयआयआरएफ) २०२४ करीता जाहीर केलेल्या क्रमवारीत महाराष्ट्रात तिसरे, पश्चिम विभागात पाचवे, तर देशात ३२ वे स्थान मिळाले आहे. ‘आयआयआरएफ’तर्फे नुकतीच देशातील फिजिओथेरपी कॉलेजांची क्रमवारी एज्युकेशन पोस्ट मॅगझीनमध्ये जाहीर करण्यात आली.

‘आयआयआरएफ’ची क्रमवारी ही तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्फत विश्लेषण करून अधिकृत व वैविध्यपूर्ण अशा पद्धतीने जाहीर होते, जी उद्योग जगताकडूनही स्वीकारली जाते. रोजगार, अध्यापन-अध्ययन व स्रोत, संशोधन, औद्योगिक उत्पन्न व एकीकरण, प्लेसमेंट धोरण व सहकार्य, भविष्यवेधी मार्गदर्शन आणि बाह्यधारणा व आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन या सात मुद्यांवर सर्वेक्षण करून ही क्रमवारी तयार केली जाते. सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स ही आरोग्य व संबंधित क्षेत्रातील नामवंत शिक्षणसंस्था आहे. उत्साही विद्यार्थ्यांची या क्षेत्रातील स्वप्ने पूर्ण व्हावीत आणि त्यांना एक चांगले करिअर घडविता यावे, यासाठी प्रयत्नशील अशी संस्था आहे.

सूर्यदत्त कॉलेज ऑफ फिजिओथेरपीतर्फे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्नित बॅचलर ऑफ फिजिओथेरपी हा पूर्णवेळ, तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड व्होकेशनल एज्युकेशन एक्झाम (एमएसबीव्हीईई) संलग्नित फिजिओथेरपी पदविका, नॅचरोथेरपी पदविका, नर्सिंग केअर प्रमाणपत्र अभ्यासक्रम, डेंटल असिस्टंट, आॅप्थाल्मिक टेक्निशियन हे अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातात. तंत्रज्ञानाभिमुख, सर्वांगीण विकासाचे शिक्षण देणारे गुणवत्तापूर्ण केंद्र म्हणून पुढे येण्याचा सूर्यदत्तचा उद्देश आहे. संशोधन, ज्ञान, प्रशिक्षण देऊन आरोग्य क्षेत्राला एक नवा आयाम देण्याचा आमचा प्रयत्न आहे. समाजाचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी फिजिओथेरपी मधील चांगले डॉक्टर तयार करण्यासाठी सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स काम करत आहे. समाजाला उपयुक्त असे मनुष्यबळ विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन उपलब्ध केले जाते.

आरोग्य विज्ञानाशी संबंधित सर्व पायाभूत अत्याधुनिक सुविधा येथे उपलब्ध आहेत. पुण्यातील विविध मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्सबरोबर सामंजस्य करार करण्यात आले असून, त्यातून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक व क्लिनिकल अनुभव देण्याचा प्रयत्न केला जातो. फिजिओथेरपी आणि संबंधित क्षेत्रातील विशेष क्षेत्रात पुरेसा अनुभव असलेल्या प्राध्यापकांच्या तज्ञ मार्गदर्शनाखाली या रुग्णालयांमध्ये क्लिनिकल प्रशिक्षण दिले जाते. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या आरोग्य विज्ञान क्षेत्रात असलेल्या उत्सुकतेमुळे हे होत आहे, असे प्राचार्या डॉ. सीमी रेठरेकर यांनी नमूद केले.

सूर्यदत्त संस्था सातत्याने विविध शिबिरांचे आयोजन करून सामाजिक आरोग्यासाठी कार्यरत असते. ज्यामध्ये रक्तदान, ऑस्टिओपथी, न्यूट्रिशन व डायटिक्स, पॅरामेडिकल, ऍक्युप्रेशर, कोअर फिजिओ आदींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली स्नायुमज्जातंतुविज्ञान, न्यूरोलॉजिकल स्थिती, बालरोग आणि पुनर्वसन यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये फिजिओथेरपी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते. हे शैक्षणिक-सामाजिक उपक्रम विद्यार्थ्यांना समाजाशी जोडण्यात उपयोगी ठरतात. त्यामुळे त्यांना शैक्षणिक प्रगतीसह सामाजिक भान आणि आरोग्यविषयक अनुभव संपन्नता मिळते. ज्यामुळे समाजावर त्यांचा सकारात्मक परिणाम होतो.

कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या या यशाबद्दल प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी आनंद व्यक्त केला. ही क्रमवारी आमचा उत्साह वाढवणारी आणि सूर्यदत्तमध्ये दिल्या जाणाऱ्या मूल्याधिष्ठित शिक्षणाचा गौरव करणारी आहे. विद्यार्थी व येथील तज्ज्ञ प्राध्यापकांच्या ज्ञानात भर घालण्यात, प्रोत्साहन देण्यात आणि संलग्नित दवाखाने आणि गरजू रुग्णांना जोडून चांगली सेवा देण्यास पूरक ठरतील. इन्स्टिट्यूट मार्फत मूल्यवर्धित प्रमाणपत्र अभ्यासक्रम देण्यात येतो, जेणेकरून त्यांची सर्वांगीण प्रगती होण्यास एकविसाव्या शतकातील व्यवस्थापकीय नेतृत्व, तात्विक कामगिरी आणि तंत्रकुशल व्यक्तिमत्व घडण्यास मदत होऊन रोजगारक्षम व व्यावसायिक प्रगती चांगली होईल, अशी भावना प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी व्यक्त केली. सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सच्या वतीने दिव्यांग पुनर्वसन केंद्र आणि भारत विकास परिषद यांच्या सहकार्याने दिव्यांगासाठी कृत्रिम हात, पाय व कॅलिपर्स वितरण शिबिराचे आयोजन केले जाते. शिक्षण आणि सामाजिक उपक्रमांत उल्लेखनीय कार्याबद्दल आजवर सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आरोग्य विज्ञानाबद्दल आकर्षण असल्याने त्यांनी गुडघेदुखीच्या रुग्णांसाठी १९८३ मध्ये (पदवी पूर्ण केल्यानंतर) ‘नी क्वाड्रिसेप्स अँड नी जॉईंट एक्सरसायझर’चा शोध लावला. गुडघ्याच्या शास्त्रक्रिये आधी व नंतर यामध्ये याचा उपयोग झाला. पुण्यातील ससून रुग्णालयाला ते हस्तांतरित केले. या उपकरणाचा वापर गुडघ्याची ताकद वाढविण्यात झाला. या शोधासाठी तत्कालीन सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
19.1 ° C
19.1 °
19.1 °
55 %
4.1kmh
20 %
Tue
25 °
Wed
26 °
Thu
23 °
Fri
24 °
Sat
23 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!