28.1 C
New Delhi
Tuesday, April 29, 2025
Homeआरोग्यकोविड घालवला आता क्षयरोग घालविण्याचा निर्धार करूया- आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. गोफणे

कोविड घालवला आता क्षयरोग घालविण्याचा निर्धार करूया- आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. गोफणे

पिंपरी : सर्वांनी निर्धार केल्यास आपण कोविडप्रमाणेच १०० दिवसात क्षयरोग घालवू शकतो. असे प्रतिपादन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी येथे केले. सध्या शहरातील ५५% लोक महापालिका रुग्णालयात सेवा घेतात. हा आकडा ८० टक्के पर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने ऑटो क्लस्टर सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. गोफणे बोलत होते. यावेळी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली डोणे, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर, शहर क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर, क्षयरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. गोविंद नरके भोसरी रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. ऋतुजा लोखंडे, डॉक्टर वैशाली भामरे, सारिका लोणकर, किशोर गवळी उपस्थित होते.
यावेळी बीजे मेडिकल च्या विद्यार्थ्यांनी तसेच सिंधू नगर दवाखाना येथील आशा वर्कर यांनी क्षयरोग निर्मूलनासाठी जनजागृती पर पथनाट्य सादर केले.
यावेळी डॉक्टर गोफणे म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिकेने वैद्यकीय क्षेत्रात एक नंबरचे इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले आहे. आरोग्य वैद्यकीय अधिकारी या नात्याने मी आदेश देत असलो तरी तुम्ही सारे जण अंमलबजावणी करता त्यामुळे शहरवासीयांना व रुग्णांना चांगली सेवा देता येते.
ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर म्हणाले की, इतर महापालिकांच्या तुलनेत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने देण्यात येत असलेली सेवा अद्वितीय अशी आहे. कोरोना काळात महापालिका रुग्णालयांनी हजारो रुग्णांना नव संजीवनी दिली आहे. क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी शासन आणि महापालिका प्रयत्न करत आहे. मात्र अजूनही हा आजार आटोक्यात आलेला नाही. शहरात २०२२ मध्ये २९३५, २०२३ मध्ये २८८८ आणि २०२४ मध्ये ३२५६ जणांना क्षयरोगाचे निदान झाले. २०२५ फेब्रुवारी अखेर ६९४ जणांना क्षयरोग झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. संशयित क्षय रुग्णांच्या तपासणीवर भर देण्याची गरज आहे. लोकांनीही आजार लपवून ठेवण्यापेक्षा योग्य त्या तपासण्या करून उपचार घेतले तर क्षय रोगाचे निर्मूलन होऊ शकेल. अज्ञानात सुख असते हे गप्पा मारायला ठीक आहे. पण हे अज्ञान कोणत्याही आजाराबाबत जीवघेणे ठरू शकते त्यामुळे लोकांनी स्वतःची स्वतः काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. अभयचंद्र दादेवार म्हणाले की सर्वांनी प्रतिज्ञा केल्यास क्षय रोगाचे उच्चाटन होईल.
यावेळी राष्ट्रीय क्षयरोग धुरीकरण कार्यक्रमात सहभागी डॉक्टर, नर्सेस,आशा वर्कर यांचा सत्कार करण्यात आला.
किशोर गवळी यांनी सूत्रसंचालन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
28.1 ° C
28.1 °
28.1 °
48 %
5.2kmh
1 %
Tue
39 °
Wed
41 °
Thu
42 °
Fri
42 °
Sat
42 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!