34 C
New Delhi
Friday, July 11, 2025
Homeक्रीड़ा'एमआयटी एडीटी' विद्यापीठाने राखले विजेतेपद

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाने राखले विजेतेपद

'एमआयटी डब्लूपीयू'ला स्पर्धेत दुसरे तर स.प. महाविद्यालयाला तिसरे स्थान

पुणेः विश्वनाथ स्पोर्ट मीट-२०२५ या राज्यस्थरिय आंतरमहाविद्यालयीन/ आंतरविद्यापीठीय क्रीडा स्पर्धेत यजमान एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करताना तब्बल १४ सुवर्ण व १८ रौप्यपदकांसह पदकतालिकेतील वर्चस्वासह आपले विजेतेपद राखले. एमआयटी एडीटी पाठोपाठ एमआयटी डब्लूपीयू संघाने एकूण ११ सुवर्ण व ६ रौप्य पदकांसह दुसरा तर सर परशूराम महाविद्यालय (स.प.) संघाने ६ सुवर्ण व ३ रौप्यपदकांसह स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविला. एमआयटी एडीटी विद्यापीठाने गतवर्षीही वर्चस्व गाजविताना विजेतेपद पटकाविले होते.

तब्बल १५ क्रीडा प्रकारांत १४०+ अधिक शिक्षण संस्थांमधील ५००० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागासह झालेल्या या स्पर्धेचे बक्षिस वितरण ब्रिगेडीअर दिलीप पटवर्धन (निवृत्त), महाराष्ट्र सरकारच्या सहाय्यक क्रीडा अधिकारी व छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार विजेत्या सायली तेजस शिंदे, विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनिता कराड, कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस., प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, प्रा.पद्माकर फड, डाॅ.सुराज भोयार आदी पाहुण्यांच्या हजेरीत पार पडले. ज्यात विद्यार्थ्यांना १० लाखांपर्यंत रोख पारितोषिके, पदक व करंडक अशी बक्षिसे देण्यात आली.


बॅडमिंटन पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात एमआयटी एडीटीच्या खेळाडूंचा ३-१ असा पराभव करत कोथरूडच्या एमआयटी डब्लूपीयूने सुवर्ण कामगिरी केली. तर महिला गटात विश्वकर्मा इस्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीने अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाचा २-० अशा फरकाने पराभव करत सुवर्णपदक पटकाविले.
बुद्धिबळाच्या पुरुष गटात आशिष संकलेचाच्या कामगिरीच्या जोरावर व्हीआयटी पुणेने एमआयटी डब्लूपीयूचा तर महिलांत रिया मराठेच्या कामगिरीच्या बळावर एमआयटी डब्लूपीयूने एमआयटी एडीटीचा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले.
बास्केटबॉल पुरुषांच्या अंतिम सामन्यांत केबीपी सातारा महाविद्यालयाच्या संघाने एमआयटी डब्लूपीयू संघाचा तर महिलांत वारणा विद्यापीठ कोल्हापूरने एमआयटी एडीटी संघाचा पराभव करत सुवर्ण कामगिरीची नोंद केली. फुटबॉल स्पर्धेच्या पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात इशांत चितळेच्या नेतृत्वाखालील एनडीए खडकवासलाने नेस वाडीय महाविद्यालय, पुणेचा पराभव केला. नेस वाडीया महाविद्यालयाच्या हितेश यादवला सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. तर महिलांत एमआयटी डब्लूपीयू संघाने एमआयटी एडीटी संघाचा ३-१ अशा फरकाने पराभव केला. तर भाग्यश्री मुखारे ही सर्वोत्तम खेळाडू ठरली.
कबड्डी पुरुष गटात एमआयटी एडीटी विद्यापीठ संघाने भारती विद्यापीठ संघाचा तर महिलांत विद्या प्रतिष्ठान बारामती संघाने एमआयटी एडीटी संघाचा पराभव करताना सुवर्णकामगिरीची नोंद केली. सौरभ रणावरे व तेजश्री चौघुले हे स्पर्धेतील सर्वात्तम खेळाडू ठरले.
अत्यंत रोमांचक ठरलेल्या पुरुष खो-खोच्या अंतिम सामन्यात गणपतराव काळभोर महाविद्यालयाने डी.वाय. पाटील विद्यापीठ आकुर्डीचा तर महिलांत विद्या प्रतिष्ठाण बारामतीने डी.वाय.पाटील अंबीचा पराभव केला. श्रेया गोसावी ही सर्वोत्तम खेळाडू ठरली. टेनिसच्या दोन्ही गटांत एनडीए खडकवासला व एमआयटी डब्ल्यूपीयूने विजेतेपद पटकाविले तर, व्हॉलीबॉलमध्ये टी.सी. काॅलेज बारामती व माॅडर्न महाविद्यालयाने सुवर्णकामगिरी केली. वाॅटर पोलो या खेळांतही एमआयटी शिक्षण समुहांच्या खेळाडूंनीच वर्चस्व गाजवले.


नेस वाडीया महाविद्यालयाकडे क्रिकेट करंडक
स्पर्धेत सर्वांत रोमांचक ठरलेल्या व एकूण ३६ संघांमध्ये झालेल्या क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद नेस वाडीया महाविद्यालयाने पटकाविले. त्यांनी डी.वाय.पाटील विद्यापीठ आकुर्डीचा पराभव केला. ज्यात तिलक जाधव (२५९ धावा) याला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. महिलांत एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या संघाने एमआयटी सोफा संघाचा पराभव केला.

रोईंगमध्ये एमआयटी बोट क्लबचे वर्चस्व
विद्यापीठाच्या बोट क्लबवर पार पडलेल्या विविध गटांच्या इनडोअर रोईंग स्पर्धेच्या पुरुष व महिला सिंगल स्कल प्रकारात योगेश बोराले व साक्षी धमाले यांनी तर डबल स्कल प्रकारात अनिकेत कोलते, यशराज गायकवाड विक्रमी वेळेसह सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर 4ई (५०० मी.) प्रकारात एकंदर एमआयटी एडीटी बोट क्लबच्या खेळाडूंनी सुवर्ण कामगिरी करताना वर्चस्व राखले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
34 ° C
34 °
34 °
49 %
2.7kmh
90 %
Fri
36 °
Sat
37 °
Sun
39 °
Mon
32 °
Tue
31 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!