देहू- पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड येथे चालू केवीएस प्रादेशिक स्पोर्ट्स मीट 2024, वयोगटा नुसार 14,17,19 वर्षाखालील मुला मुलींसाठी स्केटिंग चे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने व उपस्थितांचे स्वागत यांनी झाली. मा, प्राचार्य श्री. चंद्रशेखर सिंह चौहान यांनी स्पोर्ट्स मीट स्केटिंग2024 खुली अशी घोषित केली. विद्यार्थ्यांना पूर्ण मार्गदर्शन आणि प्रामाणिकपणे खेळण्यासाठी प्रोत्साहित केले. या कार्यक्रमात मुंबई विभागातील केवी मधील सुमारे 100 स्पर्धकांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांना शाळेच्या इमारतीत आरामदायी मुक्काम दिला जात आहे. शाळेच्या अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली आरोग्यदायी व पोषक आहार दिला जात आहे. नाष्ट्यानंतर विविध केवीएस मधील त्यांच्या एक्सपर्ट शिक्षकांसह सहभागी ना कासारसाई येथील एल एक्स टी स्पीड स्केटिंग रिंग मध्ये नेण्यात आले. जेथे क्रीडा शिक्षक श्री अंजनी शर्मा (पी ई टी ) आणि श्री अनिकेत मेहरा ( क्रीडा प्रशिक्षक ) यांच्या काळजीपूर्वक निरीक्षण आणि मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आले. स्केटिंग इव्हेंट साठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यासह आज पहिल्या दिवशी झालेल्या कार्यक्रमांमध्ये सर्व वयोगटासाठी इन लाईन आणि कवाड साठी, 2000 आणि3000 मीटर रस्ता आणि 19 वर्षाखालील सर्वयोगटासाठी 1 लॅप्रोड इनलाईन आणि 14 वर्षाखालील मुलींसाठी पाचशे मीटरचा ट्रॅक समावेश होता. कासारसाई येथे सर्व विद्यार्थी व एस्कॉर्ट शिक्षकांना दुपारचे जेवण देण्यात आले. आणि कार्यक्रम चार वाजेपर्यंत कार्यक्रम सुरूच राहिला. तसेच उद्याही स्पर्धा सुरू राहणार असून फायनल स्पर्धाही होणार आहे.सर्व स्पर्धक विद्यार्थी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत केवी टू येथे त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी परत आले. येथे त्यांना चहा आणि नाश्ता व रात्रीचे जेवण देण्यात आले.
