पुणे : शिरूर येथील शूटिंग स्पोर्टस क्लब sport मध्ये झालेल्या स्पर्धेत नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या प्रतिभावना नेमबाजांनी अविश्वसनीय १४ पदकांवर नाव कोरले आहे. त्यात ३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश आहे. तसेच अंडर १४ मुलीमध्ये स्वरा गुरूवाले, आणि अंडर १९ मुलीमध्ये कंगन सिंग व अंडर १७ मुलांमध्ये अर्थव सिंह भादोरिया यांनी एअर पिस्तूल प्रकारातील यश धक्कादायक आहे. यांनी अनुक्रमे 327/400, 325/400 व 371/400 गुण मिळवून सुवर्ण पदक पटकावले.
ध्रुव ग्लोबल स्कूल ला मिळालेल्या या यशाबद्दल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी आणि प्रिन्सिपल संगीता राऊतजी यांनी सर्वांन शुभेच्छा दिल्या.
नेमबाजी स्पर्धेत अंडर १४ पीपी sight एअर रायफल मध्ये हर्षवर्धन शर्मा (रौप्य), विहान पाटील (कांस्य) तर अंडर १७ पीप Sight एअर रायफल मध्ये कुशान पांडे (रौप्य), तनिष कन्सारा (कांस्य) पदकावर नाव कोरले. तसेच अंडर १४ एअर पिस्तूल मध्ये आदित्य गोडसे (रौप्य) व अर्णव चवन (कांस्य) आणि अंडर १७ एअर पिस्तूल मध्ये अर्थव सिंह भादोरिया (सुवर्ण) व शौर्या डुलकर (रौप्य) यांनी पदकावर शिक्कामोर्तब केला.
अंडर १९ एअर पिस्तूल मध्ये प्रमत झा (कांस्य) व अंडर १४ एअर पिस्तूल मुलीमध्ये स्वरा गुरूवाले (सुवर्ण) व शौर्या थोरवे (रौप्य), अंडर १७ एअर पिस्तूल मुलीमध्ये अनन्या मिस्त्री (रौप्य) आणि अंडर १९ एअर पिस्तूल मुलीमध्ये कंगन सिंग (सुवर्ण पदक) व त्रिशा सावंत (रौप्य) यांनी पदक मिळविले.
या खेळाडूंना प्रशिक्षक अश्विनी गुंजाल, सोनाली परेराव, संध्या फडतर यांनी प्रशिक्षण दिले. या खेळाडूंना सहाय्यक क्रीडा समन्वयक रोहित पाटील आणि क्रीडा विभाग प्रमुख दत्तात्रय काठे यांचे मोलाचे मार्गदर्शन ठरले.
जिल्हा इंटरस्कूल शूटिंग स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलची उत्कृष्ट कामगिरी
१४ पदकेः ३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ४ कांस्य पदकांवर कोरले नाव
New Delhi
clear sky
29.1
°
C
29.1
°
29.1
°
26 %
4.6kmh
0 %
Tue
32
°
Wed
35
°
Thu
36
°
Fri
36
°
Sat
35
°