बंगळुरु -दिनेश कार्तिकनं आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली होती. दिनेश कार्तिकनं आयपीएलमध्ये सहा संघांचं प्रतिनिधीत्व केलं होतं. दिनेश कार्तिकनं शेवटचं आयपीएल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळलं होतं. आरसीबीचं यंदाच्या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर दिनेश कार्तिकनं आयपीएल मधून निवृत्ती जाहीर केली होती. आता आरसीबीनं दिनेश कार्तिकवर मोठी जबाबदारी टाकली आहे. दिनेश कार्तिक आता आरसीबीचा बॅटिंग कोच आणि मेंटॉर असेल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं दिनेश कार्तिकला मोठी जबाबदारी सोपवल्याचं जाहीर केलं आहे. आयपीएल 2025 साठी दिनेश कार्तिकवर आरसीबीच्या बॅटिंग कोच आणि मेंटर पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आरसीबीनं सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर केली आहे. दिनेश कार्तिकनं निवृत्ती घेतल्यानंतर पुन्हा एकदा आरसीबीतर्फे नव्या भूमिकेत आयपीएलमध्ये कमबॅक होणार आहे. दिनेश कार्तिकनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून देखील निवृत्ती जाहीर केली आहे. आयपीएल संपल्यानंतर दिनेश कार्तिक आयसीसीच्या कॉमेंटेटर्सच्या पॅनेलवर देखील होता.
आरसीबीनं दिनेश कार्तिक संदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी दिनेश कार्तिक नव्या भूमिकेत कबॅक करत असल्याचं म्हटलं. तुम्ही एखाद्याला क्रिकेटमधून बाहेर करु शकता. पण, त्याच्यामध्ये असलेल्या क्रिकेटला बाहेर काढू शकत नाही, असं देखील आरसीबीनं म्हटले आहे.
दिनेश कार्तिकचे दमदार करिअर
दिनेश कार्तिकची आपीएलमधील कामगिरी दमदार राहिली आहे. दिनेश कार्तिकनं आयपीएलमध्ये 257 मॅच खेळल्या असून यामध्ये त्यानं 4842 धावा केल्या आहेत. यामध्ये दिनेश कार्तिकनं 22 अर्धशतकं केली आहेत. दिनेश कार्तिकच्या सर्वाधिक धावा 97 इतक्या आहेत. दिनेश कार्तिकनं आयपीएलच्या 17 व्या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. दिनेश कार्तिकनं 2024 च्या आयपीएलमध्ये 15 मॅचमध्ये 326 धावा केल्या होत्या. यानंतर दिनेश कार्तिकनं निवृत्ती जाहीर केल आहे.