27.9 C
New Delhi
Thursday, July 10, 2025
Homeक्रीड़ामुंबई इंडियन्सला नवा प्रशिक्षक मिळाला!

मुंबई इंडियन्सला नवा प्रशिक्षक मिळाला!

नवी दिल्ली : आयपीएल २०२५ (IPL 2025) पूर्वी अनेक संघांमध्ये मोठे बदल घडताना पाहायला मिळू शकते. यंदाच्या आयपीएलपूर्वी काही संघांनी आपल्या संघाचा प्रशिक्षक वर्ग बदलला आहे, तर होणाऱ्या लिलावापूर्वी संघ चांगलीच तयारी करत आहे. आता चॅम्पियन संघ म्हणून ओळख असलेल्या मुंबई इंडियन्सनेही (Mumbai Indians) नव्या प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. आयपीएल २०२५ पूर्वी आयपीएलचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सने मोठी घोषणा केली आहे. मुंबई इंडियन्सने नव्या खेळाडूचा संघाचा प्रशिक्षक म्हणून घोषणा केली आहे. मुंबई इंडियन्सने मार्क बाऊचरच्या जागी व्हीडिओ शेअर करत नव्या प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. मुंबई इंडियन्सने श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धने याची संघाच्या प्रशिक्षकपदी नेमणूक केली आहे. महेला जयवर्धने यापूर्वीही गेली अनेक वर्षे मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. आता पुन्हा एकदा त्याला आयपीएल २०२५ साठी संघात सामील केले आहे. याची घोषणा मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर पोस्ट करत केली आहे. मार्क बाउचर २०२३ आणि २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक होते. मात्र आता त्याची जागा जयवर्धने घेणार आहे. जयवर्धनेचा प्रशिक्षक म्हणून चांगला रेकॉर्ड आहे. जयवर्धनेच्या उपस्थितीत मुंबईने तीन विजेतेपद पटकावले. या संघाने २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले. मुंबईने आतापर्यंत पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. २०२२ मध्ये मुंबईने जयवर्धनेकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. त्याला क्रिकेटचे ग्लोबल हेड बनवण्यात आले. या काळात त्याने महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सलाही मदत केली. तो MLC आणि MIE साठी देखील महत्त्वपूर्ण कामगिरी करताना दिसला. आयपीएल २०२४ मुंबईसाठी खूप वाईट होते. मुंबई इंडियन्स संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी हार्दिक पंड्याच्या खांद्यावर दिली गेली. गुणतालिकेत संघ तळाच्या स्थानावर होता. मुंबईने या मोसमात एकूण १४ सामने खेळले आणि केवळ ४ सामने जिंकले. एमआयला १० सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबईच्या संघात अनेक मोठे खेळाडू होते. पण तरीही संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
27.9 ° C
27.9 °
27.9 °
59 %
1.5kmh
100 %
Thu
29 °
Fri
38 °
Sat
38 °
Sun
41 °
Mon
38 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!