मुंबई- रवीचंद्रन अश्विनची गणना जगातील स्टार फिरकीपटूंमध्ये केली जाते. अश्विनच्या फिरकीच्या बळावर भारतीय संघासाठी अनेक सामने जिंकले आहेत. अश्विनचा कॅरम बॉल खेळणं हे महान फलंदाजासाठीही अवघड असतं. पण क्रिकेटबरोबरच अश्विन आता बुध्दिबळाच्या पटावरही आला आहे. अश्विन ग्लोबल चेस लीगमधील अमेरिकन गॅम्बिट्स संघाचा सह-मालक बनल्याची बातमी समोर आली आहे.
ग्लोबल चेस लीगचा पहिला हंगाम २०२३ मध्ये खेळवण्यात आला होता. आता या लीगचे दुसरे वर्ष २०२४ मध्ये खेळवले जाणार आहे. दरम्यान या लीगमधील एक संघ रवीचंद्रन अश्विनने विकत घेतला आहे. ग्लोबल चेस लीगच्या दुसऱ्या सत्रात सहभागी होणारा सर्वात नवीन संघ अमेरिकन गॅम्बिट्स असणार आहे. ग्लोबल चेस लीग ही स्पर्धा टेक महिंद्रा आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ यांच्या संयुक्त मालकीची लीग आहे. प्रसिद्ध उद्योगपती प्रचूर पीपी, व्यंकट के नारायण आणि अश्विन यांच्या मालकीचे अमेरिकन गॅम्बिट्स या स्पर्धेत चिंगारी गल्फ टायटन्सची जागा घेतील. लीगचा दुसरा हंगाम ३ ते १२ ऑक्टोबर दरम्यान लंडनमध्ये खेळवला जाईल.
ग्लोबल चेस लीगच्या दुसऱ्या सत्रात अश्विनचे अमेरिकन गॅम्बिट्स, अल्पाइन एसजी पायपर्स, पीबीजी अलास्का नाइट्स, गंगा ग्रँडमास्टर्स, मुंबा मास्टर्स आणि गतविजेते त्रिवेणी कॉन्टिनेंटल किंग्स यांच्यात विजेतेपदासाठी लढत होईल. पाच वेळा विश्व बुद्धिबळ चॅम्पियन ठरलेल्या विश्वनाथन आनंदनेही या दिग्गज क्रिकेटपटूचे बुद्धिबळाच्या जगात स्वागत केले. विश्वनाथन आनंदने एक्सवर पोस्ट करत म्हटले, अश्विन, बुद्धिबळाच्या जगात तुझ्या नवीन व्यवसायाबद्दल अभिनंदन! क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी करणारा खेळाडू आहेसच त्याप्रमाणे अमेरिकन गॅम्बिट्ससह ग्लोबल चेस लीगमध्ये समान स्पर्धात्मक वातावरण निर्माण करशील, अशी मला खात्री आहे.
अश्विन म्हणाला ’’अमेरिकेन गॅम्बिट्सची बुद्धिबळ जगताला ओळख करून देताना आम्हाला आनंद होत आहे. सहमालक म्हणून मी संघाचा प्रवास पाहण्यास आणि त्यांच्या यशात योगदान देण्यासाठी उत्सुक आहे.
रवीचंद्रन अश्विन आता बुद्धिबळाच्या पटावर
अमेरिकन गॅम्बिट्स संघाचा सहमालक
New Delhi
overcast clouds
30.3
°
C
30.3
°
30.3
°
70 %
3.6kmh
94 %
Fri
38
°
Sat
42
°
Sun
37
°
Mon
36
°
Tue
36
°