41.9 C
New Delhi
Wednesday, June 24, 2026
Homeक्रीड़ाराष्ट्रीय रोइंग स्पर्धेत ‘एमआयटी एडीटी’च्या भाग्यश्री घुलेची सुवर्ण कमाई

राष्ट्रीय रोइंग स्पर्धेत ‘एमआयटी एडीटी’च्या भाग्यश्री घुलेची सुवर्ण कमाई

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या राष्ट्रीय सराव शिबिरासाठी निवड


पुणे : आर्मी रोइंग नोड येथे नुकत्याच झालेल्या ४३व्या वरिष्ठ राष्ट्रीय रोईंग अजिंक्यपद स्पर्धेत एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी क्रीडा अकादमीची खेळाडू भाग्यश्री घुले हिने उत्कृष्ट कामगिरी करत एक सुवर्ण व एक रौप्य पदक पटकावले. 

या उल्लेखनीय यशासह भाग्यश्री घुलेची आगामी आशियाई स्पर्धेच्या तयारीसाठी कर्नाटकातील बेल्लारी येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सराव शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे. जपान येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी हे शिबिर असणार आहे. भाग्यश्री ही एमआयटी एडीटी शिक्षण संकुलातील माईर्स एमआयटी विश्वशांती गुरुकुलच्या कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी असून तिला विद्यापीठातील राष्ट्रीय रोइंग प्रशिक्षक संदीप भापकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. भाग्यश्रीच्या या यशामुळे विद्यापीठाच्या क्रीडा क्षेत्रातील उज्ज्वल परंपरेत मानाची भर पडली आहे.

या कामगिरीनंतर एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डाॅ.विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष तथा प्र.कुलपती प्रा.डाॅ.मंगेश कराड, माईर्स शिक्षण संस्थेच्या सचिव डाॅ.स्वाती चाटे-कराड, कुलगुरू डाॅ.राजेश एस., कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, क्रीडा विभाग संचालक प्रा.पद्माकर फड, माईर्स एमआयटी गुरुकुलच्या प्रकल्प संचालक डाॅ.ज्योती जोटवानी, एमआयटी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ.रिपल शर्मा यांनी या यशाबद्दल भाग्यश्रीचे अभिनंदन करत तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या कामगिरीमुळे विद्यापीठातील तसेच राज्यातील युवा खेळाडूंना निश्चितच प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
41.9 ° C
41.9 °
41.9 °
18 %
5.1kmh
13 %
Wed
40 °
Thu
43 °
Fri
44 °
Sat
44 °
Sun
44 °

Most Popular

Recent Comments