आज १ मे म्हणजे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात सर्वत्र पार पडत आहे. अशातच आता तुमच्या खिशाचे जराचे बजेट बिघडणार आहे. आजपासूनच एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत आणि आयसीआयसीआय बँकेच्या बचत खात्यावरील शुल्कामध्ये अनेक बदल पाहायला मिळतील.
येस बँक– विविध प्रकारच्या बचत खात्यांसाठी किमान सरासरी शिल्लकमध्ये बदल करण्यात आले आहेत. आता येस बँकेच्या प्रो मॅक्स बचत खात्यांसाठी किमान सरासरी शिल्लक 50,000 रुपये आणि कमाल शुल्क 1000 रुपये करण्यात आले आहे. तर Pro Plus, Yes Respect SA आणि Yes Essence SA खात्यांसाठी, किमान सरासरी शिल्लक मर्यादा रुपये 25,000 आणि कमाल शुल्क रुपये 750 आहे. खाते प्रो मध्ये किमान शिल्लक 10,000 रुपये आहे आणि त्यात कमाल शुल्क 750 रुपये आहे.
आयसीआयसीआय बँक – सेव्हिंग कार्डशी संबंधित नियमांमध्येही बदल करणार आहे. आता ग्रामीण भागातील ग्राहकांना डेबिट कार्डसाठी 99 रुपये आणि शहरी भागातील 200 रुपये वार्षिक शुल्क भरावे लागणार आहे. यासोबतच बँकेने 25 पानांच्या चेकबुकसाठी कोणतेही शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र त्यानंतर चेकबुकच्या प्रत्येक पानासाठी 4 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. IMPS व्यवहाराची रक्कम प्रति व्यवहार 2.50 ते 15 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
एफडी साठी अंतिम तारीख–
HDFC बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष FD योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये ते 10 मे पर्यंत सामील होऊ शकतात. या योजनेत, ज्येष्ठ नागरिकांना 0.75% अतिरिक्त व्याजदर उपलब्ध आहे, ज्याद्वारे ते 5 ते 10 वर्षांच्या FD योजनेवर 7.75% व्याजदराचा लाभ घेऊ शकतात. या योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिक 5 कोटी रुपये जमा करू शकतात.
आजपासून काय काय बदलणार ?
थोडे फार बदलू शकते तुमचे बजेट
New Delhi
overcast clouds
31.8
°
C
31.8
°
31.8
°
65 %
1.5kmh
97 %
Fri
34
°
Sat
37
°
Sun
39
°
Mon
32
°
Tue
31
°