एसटीच्या हुबेहुब मिनिएचर (लहान प्रतिकृत्या) साकारण्यासाठी प्रसिध्द असलेल्या अकोल्याच्या पियुष राऊतने पहिल्यांदाच पुण्याच्या सार्वजनिक वाहतूकीचा कणा असलेल्या पीएमपी बसचे हुबेहुब मिनिएचर (लहान प्रतिकृती) साकारले आहे. पीएमपीच्या बसची पहिल्यांदाच अशी लहान प्रतिकृती साकारण्यात आली असून, पियुष ती प्रतिकृती पीएमपीच्या वाहकाला(कंडक्टर) भेट देणार आहे.
