पुणे – गेल्या २५ वर्षांपासून समाजात अविरतपणे लोकहिताचे काम करणाऱ्या आणि जनसामान्यांच्या मनात सकारात्मक विचार (हॅपी थॉट्स) रुजवणाऱ्या तेजज्ञान फाउंडेशन रौप्य महोत्सवी वर्ष यंदा साजर करत आहे. या रौप्य महोत्सवी सोहळा येत्या रविवारी ८ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वा. मोठ्या दिमाखात हा सोहळा पार पडणार असून प्रसिद्ध संगणक शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.सदरील सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून सुप्रसिद्ध अभिनेता व चित्रपट निर्माता सोनू सूद उपस्थित राहणार आहे. सदरील सोहळा सिहंगड रोड येथील नांदोशीगावाजवळील मनन आश्रम येथे पार पडणार आहे. अशी माहिती पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये तेजज्ञान फाऊंडेशनच्या विश्वस्त कल्याणी धरणे, वरिष्ठ समन्वयक गोविंद बोंदिया, हेमंत सलामे, शिल्पा भटेवरा यांनी दिली.तेजज्ञान फाउंडेशनची स्थापना तेजगुरू सरश्री यांनी केली असून त्यांनी आपले जीवन संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी समर्पित केले आहे. या महोत्सवात त्यांचे हजारो शिष्य सहभागी होणार होणार आहेत. या कार्यक्रमासाठी पुणेकरांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन तेजज्ञान फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.
तेजज्ञान फाउंडेशनच्या रौप्य महोत्सवी सोहळा ८ डिसेंबर रोजी पार पडणार
पद्मभूषण डॉ. विजय भटकर, सुप्रसिद्ध अभिनेता सोनू सुद यांची विशेष उपस्थिती राहणार
RELATED ARTICLES
New Delhi
mist
17.1
°
C
17.1
°
17.1
°
82 %
2.1kmh
20 %
Wed
19
°
Thu
22
°
Fri
22
°
Sat
22
°
Sun
23
°