35 C
New Delhi
Tuesday, July 8, 2025
Homeज़रा हट केसार्वजनिक जागा कचरामुक्त करून तयार केले जात आहेत ‘सेल्फी पॉईंट’!

सार्वजनिक जागा कचरामुक्त करून तयार केले जात आहेत ‘सेल्फी पॉईंट’!

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे अनोख्या उपक्रमाचे होत आहे कौतुक

पिंपरी, : पिंपरी चिंचवड शहर कचरामुक्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने विविध उपक्रम सुरू केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी असा परिसर स्वच्छ करून तेथे ‘सेल्फी पॉईंट’ केले जात आहेत. अशा जागांवर सेल्फी काढण्यासाठी नागरिकांचीही लगभग वाढू लागली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सार्वजनिक जागा कचरामुक्त करीत तो परिसर सुंदर करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक २३ येथील संजीवनी बिल्डींग कॉर्नर येथील परिसर कचरामुक्त करत तो परिसर सुशोभित केला आहे.

कचऱ्यातील टाकाऊ टायरचा तसेच झाकणाचा वापर करत आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी परिसर कचरामुक्त करत सुंदर ‘सेल्फी पाईंट’ तयार केलाय. तसेच आजबाजूच्या परिसराची स्वच्छता करून त्या जागेला आकर्षक बनवण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी देखील आरोग्य विभागाच्या या कामाचे कौतुक केले असून सगळ्यांसाठी हा सेल्फी पाईंट आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय. उप आयुक्त सचिन पवार, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड महापलिका क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी कुंडलिक दरवडे, मुख्य आरोग्य निरीक्षक शशिकांत मोरे, आरोग्य निरीक्षक गणेश राजगे, आरोग्य सहाय्यक सचिन उघडे यांच्यासह आरोग्य विभागातील इतर कर्मचाऱ्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत.
…….
चौकट

पिंपळे गुरव येथे राबवण्यात आली ‘वेस्ट टू आर्ट’ संकल्पना

पिंपळे गुरव येथील महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक २९ मधील विजयनगर बस स्टॉप येथील ठिकाण संपूर्ण कचरामुक्त करून त्या परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. टाकाऊ वस्तूंचा वापर करून ‘वेस्ट टू आर्ट’ संकल्पनेंतर्गत खराब झालेले टायर, पुठ्ठा, मातीचा माठ, टाकाऊ सिमेंटचे पाईप यांचा उपयोग करून आकर्षक सेल्फी पॉईट तयार करण्यात आला आहे. तसेच येथे आरोग्य व पर्यावरण विषयक जनजागृती करणारे सामाजिक संदेश लिहिण्यात आले आहेत. या उपाययोजनांमुळे गेल्या काही दिवसापासून येथे कचरा टाकणे बंद झाले असून स्थानिक नागरिकांकडून आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. हा परिसर कचरामुक्त करण्यासाठी आरोग्य अधिकारी शांताराम माने, मुख्य आरोग्य निरीक्षक शंकर घाटे, योगेश फल्ले, आरोग्य निरीक्षक प्रणय चव्हाण यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
…………..
कोट

पिंपरी चिंचवड शहर कचरामुक्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून सातत्याने विविध उपक्रम राबवले जात असतात. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ‘आर्ट टू वेस्ट’ ही संकल्पना अतिशय प्रभावीपणे राबवत असून स्वच्छतेबरोबर कलात्मकता जपण्याचे काम आरोग्य विभागाकडून केले जात आहे. नागरिकांनी देखील आपले शहर कचरामुक्त करण्यासाठी महानगरपालिकेला सहकार्य करावे.

-विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

….

कोट

सार्वजनिक जागेवर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी तेथे स्वच्छता करून तो परिसर टाकाऊ वस्तूंचा वापर करून कल्पकतेने सजवण्याचा उपक्रम आरोग्य विभागाने हाती घेतला आहे. या अंतर्गत शहरातील विविध सार्वजनिक जागा स्वच्छ व सुंदर करण्यात येत आहेत. नागरिकांनी देखील सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता त्या जागांची स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेला सहकार्य करण्याची गरज आहे.

  • सचिन पवार, उप आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
    ……….
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
35 ° C
35 °
35 °
54 %
2.9kmh
17 %
Tue
39 °
Wed
38 °
Thu
30 °
Fri
37 °
Sat
38 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!