33.1 C
New Delhi
Tuesday, June 23, 2026
Homeज़रा हट के'फॉर्म्युला भारत'मध्ये 'एमआयटी एडीटी' विद्यापीठाचे दैदिप्यमान यश

‘फॉर्म्युला भारत’मध्ये ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचे दैदिप्यमान यश

यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाच्या ‘टीम स्पीडटेल रेसिंग’ने जिंकले विजेतेपद

पुणे: एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणेच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाच्या (मेकॅनिकल) ‘टीम स्पीडटेल रेसिंग’ने तामिळनाडूतील कोईम्बतूरच्या कारी मोटर स्पीडवेवर नुकत्याच पार पडलेल्या ‘फॉर्म्युला भारत २०२६ (डायनॅमिक्स)’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत कंबशन प्रकारात ‘ओव्हरऑल डायनॅमिक्स’ विजेतेपद पटकावले.

या स्पर्धेत संघातील अभिषेक साहा याने उत्कृष्ट वाहनचालन कौशल्य व तांत्रिक प्रावीण्याच्या जोरावर ‘सर्वोत्तम चालक पुरस्कार’ मिळवला. वाहन रचना, गतिशास्त्र तसेच अभियांत्रिकी नवकल्पनांतील प्रावीण्याच्या बळावर संघाने हे यश संपादन केले. फॉर्म्युला भारत २०२६ (डायनॅमिक्स) ही भारतातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठीची एक प्रतिष्ठित राष्ट्रीय स्तरावरील मोटरस्पोर्ट स्पर्धा आहे. यात देशभरातील महाविद्यालयीन संघ स्वतः डिझाइन व तयार केलेल्या फॉर्म्युला-शैलीतील रेस कार्स सादर करतात.

या यशात एरोस्पेस, इलेक्ट्रॉनिक्स विभाग तसेच इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (आयओडी) मधील विद्यार्थ्यांचाही सक्रिय सहभाग असून, विविध शाखांतील समन्वयाचे प्रभावी दर्शन घडले. संपूर्ण संघाला डॉ.अनुराग नेमा आणि प्रा. विजयकुमार शेप यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष तथा कुलपती प्रा.डाॅ.विश्वनाथ दा.कराड, कार्याध्यक्ष तथा प्र.कुलपती प्रा.डाॅ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक डॉ. सुनीता कराड, कुलगुरु डॉ. राजेश एस., प्रोवोस्ट डॉ. सायली गणकर, प्र.कुलपती डॉ. रामचंद्र पुजेरी, डाॅ.नचिकेत ठाकूर, कुलसचिव डॉ.महेश चोपडे, अभियांत्रिकी शाखेचे अधिष्ठाता डॉ. सुदर्शन सानप, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ.सुराज भोयार यांनी विशेष कौतुक केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
33.1 ° C
33.1 °
33.1 °
35 %
3kmh
0 %
Tue
41 °
Wed
41 °
Thu
43 °
Fri
43 °
Sat
44 °

Most Popular

Recent Comments