42.9 C
New Delhi
Sunday, June 15, 2025
Homeताज्या बातम्याअतिक्रमण निष्कासनाची कारवाई

अतिक्रमण निष्कासनाची कारवाई

पिंपरी ‍- पिंपरी ‍चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र.०२ मधील मोरे पाटील चौक ते कुदळवाडी पोलीस चौकी येथे १८ मीटर रुंद डी.पी. रस्ता (३०० मीटर लांबी ) व कुदळवाडी पोलीस चौकी ते विसावा चौक या ३० मीटर रुंद डी.पी.रस्ता ५५० मीटर लाबींच्या डी.पी.रस्ता रस्त्याच्या दुतर्फ़ा सुमारे ९००० चौ.मी. क्षेत्रातील ३० आर.सी.सी.बांधकामे, तसेच सुमारे ४००० चौ.मी. क्षेत्रामधील ४५ वीट बांधकामांसह पत्राशेड इत्यादीवर अतिक्रमण निष्कासनाची आज कारवाई करण्यात आली.पिंपरी ‍चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे – पाटील , शहर अभियंता मकरंद निकम व मनोज लोणकर उपआयुक्त यांचे निर्देशानुसार कारवाई करणेत आली.क, इ व फ़ क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, राजेश आगळे , सिताराम बहुरे तसेच कार्यकारी अभियंता सुर्यकांत मोहिते (बांधकाम परवानगी), कार्यकारी अभियंता क स्थापत्य सुनिलदत्त नरोटे, उपअभियंता मनोज बोरसे, नरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली कनिष्ठ अभियंता संदिप वैद्य, किरण सगर, अशोक मोरे, अश्रुबा वाकोडे, इम्रान कलाल, अनिल गडदे, व क्षितीजा देशमुख, तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सुमीत जाधव,ऎश्वर्या मासाळ , निकिता फ़डतरे, स्मिता गव्हाणे व इतर इ व फ़, कडील ०६ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व मनपा कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बल जवान , महाराष्ट्र पोलिस कर्मचारी यांच्या नियंत्रणाखाली सदर कारवाई करण्यात आली.

प्रभाग क्र.०२ चिखली / कुदळवाडी परिसरातील एकूण १३००० चौ.मी. आर.सी.सी.बांधकामे व पत्राशेडवर ०२ पोकलेन,०२ जेसीबी व ०२ मालवहू ट्रक यांच्या सहाय्याने अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली. तसेच दि.१९/१२/२०२४ रोजी अतिक्रमण निष्कासनाची कारवाई सुरु राहणार आहे.दि.१८/१२/२०२४ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत क, इ व फ़ क्षेत्रीय कार्यालयाकडील अतिक्रमण पथक, ५६ महाराष्ट्र सुरक्षा बल जवान , स्थानिक पोलिस स्टेशन चिखली मधील बंदोबस्तात १२ अधिकारी / कर्मचारी तसेच महाराष्ट्र पोलीस अधिकारी / कर्मचारी सहभागी झाले होते.मंजूर विकास आराखड्यातील रस्ते विकसित करणेकामी कारवाई या पुढेही सुरु राहील, असे मनपा तर्फ़े आवाहन करणेत आले.

दररोज शहराच्या विविध भागात अतिक्रमण कारवाई केली जात आहे, महानगरपालिका आयुक्त यांच्या निर्देशनानुसार सदर कारवाई केलेल्या ठिकाणी मनपा परवानगी घेतल्याशिवाय अनधिकृत पत्राशेड / बांधकाम करु नये, अशा सुचना देण्यात आल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
42.9 ° C
42.9 °
42.9 °
36 %
0.7kmh
0 %
Sun
45 °
Mon
43 °
Tue
43 °
Wed
45 °
Thu
42 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!