पुणे-यंदा बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला आहे. यंदाही निकालात कोकण विभागानं बाजी मारली आहे. 97.51 टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर 91.95 टक्क्यांसह मुंबई विभाग तळाशी आहे. यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी मारली आहे. 95.44 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी 91.60 टक्के आहे.
बारावीत विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचा निकाल सर्वाधिक; कला शाखेत उत्तीर्णतेचा टक्का कमी
- कोकण : 97.51 टक्के
- पुणे : 94.44 टक्के
- कोल्हापूर : 94.24 टक्के
- अमरावती : 93 टक्के
- छत्रपती संभाजीनगर : 94.08 टक्के
- नाशिक : 94.71 टक्के
- लातूर : 92.36 टक्के
- नागपूर : 93.12 टक्के
- मुंबई : 91.95 टक्के