पुणे -: विद्यार्थिनींनी आपल्या अनुभवांचा परिघ विस्तीर्ण करून जीवन अधिक समृद्ध बनवावे, असे प्रतिपादन एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रो. उज्वला चक्रदेव यांनी केले. एसएनडीटी पुणे आवारात कुलगुरूंच्या हस्ते ‘संस्कृता’ व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. जीवनातील अडथळे आणि आव्हानांचे रूपांतर संधीत करता येते. यासाठीचा आत्मविश्वास विद्यार्थिनींमध्ये निर्माण होऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प डॉ. उज्वला पळसुले यांनी गुंफले. आपल्या व्याख्यानातून डॉ. पळसुले यांनी विविध कालखंडांदरम्यान भारतीय स्त्रियांमधील स्थित्यंतराबद्दलची सविस्तर मांडणी केली. व्याख्यानंतर झालेल्या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमातून विद्यार्थिनींच्या शंकांचे समाधान करण्यात आले. तत्पूर्वी, गृहविज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश चव्हाण यांनी प्रास्ताविकपर मनोगत मांडले. प्रस्तुत व्याख्यानमालेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना प्राचार्यांनी विद्यापीठ प्रशासन आणि कुलगुरूंच्या विद्यार्थीस्नेही भूमिकेचा विशेषत्वाने उल्लेख केला.
एसएनडीटी पुणे आवारप्रमुख डॉ. शितल मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रद्धा पाटणकर यांनी केले. कार्यक्रमास एसएनडीटी पुणे आवारातील विविध विभागांचे प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
एसएनडीटीत ‘संस्कृता’ व्याख्यानमालेचे उद्घाटन
RELATED ARTICLES
New Delhi
scattered clouds
26.4
°
C
26.4
°
26.4
°
75 %
4.8kmh
25 %
Tue
29
°
Wed
36
°
Thu
29
°
Fri
34
°
Sat
37
°