35.9 C
New Delhi
Tuesday, June 23, 2026
Homeताज्या बातम्याकृष्णानगर येथे ५१ फूट उंच भगव्या ध्वजाचे राष्ट्रार्पण

कृष्णानगर येथे ५१ फूट उंच भगव्या ध्वजाचे राष्ट्रार्पण

- भाजपा आमदार महेश लांडगे यांची उपस्थिती

– देव-देश-धर्मासाठी जागृत राहण्याचा संकल्प

पिंपरी-चिंचवड – पिंपरी-चिंचवड महानगरपलिका प्रभाग क्रमांक ११ मधील कृष्णानगरमध्ये हिंदु नववर्षारंभ अर्थात गुढी पाडवाच्या निमित्ताने देशभक्ती, हिंदुत्व आणि अभिमान यांचा अद्वितीय संगम पाहायला मिळाला. या वेळी भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते ५१ फुटी भव्य भगव्या ध्वजाचे राष्ट्रार्पण करण्यात आले, ज्यामुळे परिसरातील नागरिकांच्या मनात नवीन उत्साह निर्माण झाला.

ध्वजारोहण सोहळा कामगार नेते सचिन लांडगे यांच्या शुभहस्ते पार पडला. आकाशात झेपावलेला भगवा ध्वज पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत अभिमान व्यक्त केला. या भव्य उपक्रमाची संकल्पना जगदंब प्रतिष्ठान, कृष्णानगर यांनी केली असून, स्थानिक नगरसेविका रिटा सचिन सानप आणि सामाजिक कार्यकर्ते सचिनसानप यांच्या पुढाकारातून हा सोहळा साकार झाला.

सोहळ्यात आमदार महेश लांडगे, कामगार नेते सचिन लांडगे, नगरसेवक निलेश नेवाळे, कुंदन गायकवाड, योगिता नागरगोजे, पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे आणि अनेक समाजसेवी तसेच नागरिक उपस्थित होते.

नगरसेविका रिटा सानप म्हणाल्या की, “या भव्य ध्वजारोहणामुळे कृष्णानगर परिसरात हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीचा संदेश अधिक बळकट झाला आहे आणि नागरिकांमध्ये नवीन ऊर्जा संचारली आहे.”
**

प्रतिक्रिया :
“देशभक्ती ही फक्त गाणी, ध्वज किंवा उत्सवापुरती मर्यादित नाही. ती आपल्या रोजच्या कर्मात, आपल्या प्रत्येक कृतीत आणि समाजाच्या विकासात प्रकटली पाहिजे. जेथे श्रद्धा आणि समर्पण असते, तिथे राष्ट्रभक्तीची खरी उंची गाठता येते. आपल्याला आपली संस्कृती जपायची आहे, आपले मूल्य जपायचे आहेत आणि प्रत्येक छोटा उपक्रम समाजात मोठा बदल घडवू शकतो. भगवा ध्वज हे फक्त कापड नाही, तर त्यामध्ये आपली एकता, आपली ओळख आणि आपल्या भविष्याची दिशा दडलेली आहे. नागरिकांनी हा संदेश आत्मसात केला तरच आपण वास्तवात राष्ट्रभक्तीचा आदर्श निर्माण करू शकतो.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
35.9 ° C
35.9 °
35.9 °
29 %
2.9kmh
0 %
Tue
41 °
Wed
41 °
Thu
43 °
Fri
43 °
Sat
44 °

Most Popular

Recent Comments