28.4 C
New Delhi
Wednesday, July 2, 2025
Homeताज्या बातम्याकॅलिफोर्नियाच्या एसएइ एरो डिझाईन वेस्ट स्पर्धेत पीसीसीओईचे नेत्रदीपक यश 

कॅलिफोर्नियाच्या एसएइ एरो डिझाईन वेस्ट स्पर्धेत पीसीसीओईचे नेत्रदीपक यश 

   पीसीसीओई टीमचे नेतृत्व रिफा अन्सारी हिने केले. यामध्ये पार्थ देशमुख, मिहीर रमेश झांबरे, अनिकेत पिंगळे, अपूर्वा परदेशी, तन्मय राजपूत, ओम दुर्गे, प्रणाली मगदूम, आयुष बोडखे, सर्वेश पाटील, अनिरुद्ध पाटील, मृणाल सागरे, तृप्ती बावनकर या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

पिंपरी, पुणे – कॅलिफोर्निया, यूएसए येथे सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स (SAE) इंटरनॅशनल द्वारे आयोजित करण्यात आलेल्या एसएई एरो डिझाईन वेस्ट स्पर्धेत पीसीसीओईच्या “टीम मावेरिक इंडिया” या संघाने नेत्रदीपक यश मिळवले. ७५ देशातील विविध संघांनी यामध्ये सहभाग घेतला होता. जागतिक पातळीवर प्रतिष्ठेच्या या स्पर्धेत “टीम मावेरिक इंडिया” संघाने विविध गटात उल्लेखनीय यश मिळवून एकूण स्पर्धेत जागतिक पातळीवर दहावा क्रमांक पटकावला आणि नेत्रदीपक यश मिळवले. या यशामुळे जागतिक पातळीवर भारतीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमध्ये उच्च तांत्रिक क्षमता असल्याचे सिद्ध झाले आहे.    पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयातील (पीसीसीओई) विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रेडिओ-नियंत्रित विमानाच्या डिझाइन, अभियांत्रिकी आणि उड्डाण क्षमतांचे मूल्यांकन उल्लेखनीय होते. या स्पर्धेत जगभरातील संघ नाविन्यपूर्णता, तांत्रिक कौशल्ये आणि टीमवर्कचे प्रदर्शन करतात. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
28.4 ° C
28.4 °
28.4 °
77 %
2.7kmh
21 %
Wed
38 °
Thu
40 °
Fri
38 °
Sat
36 °
Sun
35 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!