पुणे, – “भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून ते वासुदेव बळवंत फडके या सर्वांचे योगदान महत्वाचे आहे. यां कालावधीत देशभक्तांना दांडपट्टा, लाठीकाठी शिकविणारे व राष्ट्रकार्यासाठी प्रेरित करणारे एकमेव व्यक्तिमत्व लहूजी राघोजी साळवे या नावाने प्रसिद्ध होते. त्यामुळे क्रांतीगुरू लहुजी साळवे अध्यासन सुरू व्हावे. ” असे मत ज्येष्ठ साहित्यिक श्याम भुर्के यांनी व्यक्त केले.
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणेतर्फे ‘ओळख देशभक्तांची शाळा तेथे क्रांती मंदिर’ असे ९४८ दिवसांच्या परिक्रमेंतर्गत २ हजार क्रांतिकारकांच्या छायाचित्रांच्या भव्य प्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व आर्ट गॅलरीमध्ये करण्यात आले. या प्रदर्शनीच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेचे अविनाश चापेकर, देवदेवेश्वर संस्थांचे विश्वस्त भागवत, वस्ताद लहुजी राघोजी साळवे मांग यांचे वशंज कुणाल साळवे, देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने व मंजिरी शहासने उपस्थित होते.
श्याम भुर्के म्हणाले,”क्रांतीगुरू लहुजी साळवे यांच्या कार्याचा जनतेला म्हणावा तसा परिचय नाही. तेव्हा त्या कार्याचे उचित संशोधन होणे ही काळाची गरज आहे.”
अविनाश चापेकर म्हणाले, “देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने यांच्या संग्रहातील २ हजार देशभक्तांच्या चित्रांचे प्रदर्शन अत्यंत उपयुक्त व स्वागतर्हा असून ते समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी शहासने गावोगावी फिरत आहेत. हे कौतुकास्पद आहे.”
भागवत म्हणाले, ” देवदेवेश्वर संस्थांच्या सर्व सभागृहांमध्ये हे प्रदर्शन लवकरात लवकर भरवण्यात यावे. जेणेकरून पुण्यातील असंख्य लोकांना याचा लाभ मिळेल. ”
याप्रसंगी वस्ताद लहुजी राघोजी साळवे मांग यांचे वशंज कुणाल साळवे यांच्या परिवारांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास उज्ज्वल ग्रंथ भांडारचे जोशी यांच्या सहित अनेक मान्यवर उपस्थित होते.
कर्नाळा ट्रस्टच्या विश्वस्त मंजिरी शहासने यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.
क्रांतीगुरू लहुजी साळवे अध्यासन सुरू करावेज्येष्ठ साहित्यिक श्याम भुर्के यांचे मत
२ हजार क्रांतिकारकांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचा समारोप
RELATED ARTICLES
New Delhi
fog
10.1
°
C
10.1
°
10.1
°
100 %
2.6kmh
100 %
Tue
22
°
Wed
22
°
Thu
19
°
Fri
22
°
Sat
20
°