29.1 C
New Delhi
Tuesday, March 18, 2025
Homeताज्या बातम्याडॉ. कल्याण गंगवाल अहिंसा, करुणा रत्न पुरस्काराने सन्मानित

डॉ. कल्याण गंगवाल अहिंसा, करुणा रत्न पुरस्काराने सन्मानित

सारस्वताचार्य श्री देवनंदी आचार्य गुरुदेव यांच्या हस्ते  डॉ. कल्याण गंगवाल यांना अहिंसा करुणा रत्न पुरस्कार प्रदान

शाकाहाराच्या प्रचारात अग्रणी असलेल्या डॉ. कल्याण गंगवाल यांना पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवात सारस्वताचार्य श्री देवनंदी आचार्य गुरुदेव यांच्या उपस्थितीत अहिंसा करुणा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदरील सोहळा हा गंगाधाम येथील नाजुश्री सभागृह येथे मोठ्या उत्सवात पार पडला. यावेळी डॉ. कल्याण गंगवाल यांच्यासह त्यांची पत्नी चंद्रकला गंगवाल यांनी सदरील हा पुरस्कार स्वीकारला.

डॉ. कल्याण गंगवाल यांना जीव दया परोपकार शाकाहार क्षेत्रात काम करणे नवीन नाही.  वयाच्या ८१ व्या वर्षीही ते नेहमीच काम करत असतात. सर्वजीवमंगल प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रात २०० ठिकाणी होणारी देवी-देवतांसमोर बलिदानाची प्रथा बंद केली आहे.

आचार्य श्री म्हणाले गढीमाई नेपाळ सीमेवर जीवाची पर्वा नकरता डॉ. कल्याण गंगवाल यांनी हजारों प्राण्यांचे जीव बचावले व पशुबळी प्रथा बंद करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली त्यामुळे हजारो प्राण्यांना संरक्षण मिळाले. त्यांनी आपले तन, मन आणि धन हे समाजातील लोकहिताच्या कामासाठी इतके समर्पित केले की, आपल्या उत्पन्नातील ५० टक्के रक्कम त्यांनी या कामासाठी वापरत आहेत.

पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव यशस्वी करण्यासाठी मनीष बडजात्या, विनय चुडीवाल, स्वप्नील पाटणी, शीतल लुहाडिया, देवेंद्र बाकलीवाल आदींचे विशेष सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
29.1 ° C
29.1 °
29.1 °
26 %
4.6kmh
0 %
Tue
32 °
Wed
35 °
Thu
36 °
Fri
36 °
Sat
35 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!