34.2 C
New Delhi
Thursday, April 24, 2025
Homeताज्या बातम्या"धनुष्यबाण" या चिन्हावर लढविलेल्या सर्व जागा शिवसेनेच्याच राहणार - प्रमोद नाना भानगिरे

“धनुष्यबाण” या चिन्हावर लढविलेल्या सर्व जागा शिवसेनेच्याच राहणार – प्रमोद नाना भानगिरे

येत्या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे शहरात शिवसेनेची पक्ष बांधणी मोठ्या प्रमाणावर मजबूत झाली असून मागील काळात पुणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढवलेल्या सर्व जागा शिवसेनाच लढवेल अशी भूमिका शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी मांडली.

प्रमोद नाना भानगिरे पुढे म्हणाले की, पुणे शहरात प्रभाग निहाय शिवसैनिकांची बैठक आयोजित करून अनुकूल असणाऱ्या प्रभागात शिवसेनेच्या वतीने मतदारांचा सर्व्हे सुद्धा केला जात असून इतर पक्षातील कोणतेही नगरसेवक महायुतीतल्या घटक पक्षात सामील झाले तरीही राज्य पातळीवर महायुतीचा ठरलेला फॉर्म्युलाच संपूर्ण राज्यात राबविल्या जाणार आहे. येत्या काळात शिवसेनेत काही नगरसेवक व विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर प्रवेश करणार आहेत, ते पुढे म्हणाले, संपूर्ण राज्यात महायुती म्हणून तिन्ही पक्ष कार्यरत असून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व शिवसेनेचे वरिष्ठ नेते जे ठरवतील त्याचप्रमाणे पुणे शहरात येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला शिवसेना सामोरे जाणार आहे हेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना पुणे शहरात 40 ते 50 जागांवर पूर्वतयारी आढावा, संघटन बांधणी आणि निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी करीत आहे, शिवसेनेच्या प्रत्येक गटप्रमुखाला सक्रिय करत सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो पुणेकरांपर्यंत पोहोचण्यासाठीही शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असून निश्चितच पुणे शहरात शिवसेनेच्या माध्यमातून पुणेकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम तत्पर असू असेही त्यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेला शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अजय बापू भोसले, महिला आघाडी सहसंपर्कप्रमुख सुदर्शनाताई त्रिगुनाईत, पुणे जिल्हा महिला आघाडी संपर्कप्रमुख गीतांजलीताई ढोणे, युवा सेना शहरप्रमुख निलेश गिरमे, उपशहर प्रमुख सुधीर कुरूमकर, संजय डोंगरे, सुनील जाधव, शहर संघटक श्रीकांत पुजारी, नवनाथ निवंगुणे, युवासेना कार्यकारणी सदस्य कौस्तुभ कुलकर्णी, श्रुतीताई नाझिरकर, सुरेखाताई पाटील, नितीन लगस, गणेश काची, निलेश जगताप, व शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
34.2 ° C
34.2 °
34.2 °
10 %
2.2kmh
0 %
Thu
41 °
Fri
42 °
Sat
41 °
Sun
42 °
Mon
41 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!