28 C
New Delhi
Tuesday, July 15, 2025
Homeताज्या बातम्यालक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात १२७ वा गुरुपौर्णिमा उत्सव

लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात १२७ वा गुरुपौर्णिमा उत्सव


कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट, पुणे ; आमदार रवींद्र धंगेकर, उद्योजक पुनीत बालन, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आरती

पुणे : बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई dagdusheth दत्तमंदिर ट्रस्टचा १२७ वा गुरुपौर्णिमा उत्सव रविवार, दिनांक २१ जुलै रोजी साजरा होणार आहे. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मंदिराला आकर्षक पुष्परचना व विद्युतरोषणाई देखील करण्यात आली आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला दत्तमंदिर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, खजिनदार अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सवप्रमुख सुनिल रुकारी, उत्सव उपप्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त महेंद्र पिसाळ, अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, डॉ. पराग काळकर, युवराज गाडवे आदी उपस्थित होते.

रविवारी सकाळी ६ वाजता विश्वस्त डॉ. पराग काळकर व कुटुंबियांच्या हस्ते लघुरुद्र होणार आहे. त्यानंतर सकाळी ८ वाजता अध्यक्ष राजेंद्र बलकवडे व कुटुंबियांच्या हस्ते दत्तयाग संपन्न होईल. सकाळी ८.३० वाजता आमदार रवींद्र धंगेकर व प्रतिभा धंगेकर यांच्या हस्ते प्रात:आरती होईल. Dutta Mandir

अ‍ॅड.प्रताप परदेशी म्हणाले, गुरुपौर्णिमा उत्सवात पीडीसीसी बँकेचे समीर रजपूत यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता व दुपारी २ वाजता राहुल नहार यांच्या हस्ते दत्तयाग Datt yag होणार आहे. माध्यान्ह आरती उद्योजक पुनीत बालन व जान्हवी बालन यांच्या हस्ते दुपारी १२.३० वाजता होणार आहे. तर, सायं आरती पत्रकार अर्चना मोरे व भारतीय महिला बेसबॉल संघाची कप्तान रेश्मा पुणेकर यांच्या हस्ते सायंकाळी ७ वाजता होणार आहे. केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व मोनिका मोहोळ यांच्या हस्ते रात्री ८.३० वाजता दत्तमहाराजांची आरती संपन्न होईल. रात्री १०.३० ते ११.३० यावेळेत मंदिरात पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे.

सकाळी ८ ते दुपारी १ यावेळेत मंदिरासमोरील उत्सव मंडपात भाविकांना स्वहस्ते अभिषेक abhishek देखील करता येणार आहेत. तसेच दिवसभर बुंदी व फळांच्या प्रसादाचे वाटप मंदिरात केले जाणार आहे. तरी भाविकांनी उत्सवात मोठया संख्य्ने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
28 ° C
28 °
28 °
51 %
7kmh
90 %
Tue
30 °
Wed
35 °
Thu
29 °
Fri
35 °
Sat
37 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!