पुणे : श्रीपाद वल्लभ दिगंबरा… दत्त गुरु…दत्त गुरु… च्या नामघोषात गुरुपौर्णिमेनिमित्त बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात Datta Mandir भाविकांनी दत्तमहाराजांच्या दर्शनासाठी मोठया संख्येने गर्दी केली. ट्रस्टच्या १२७ व्या गुरुपौर्णिमा Guru Purnima उत्सवानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात होते, तसेच मंदिराला आकर्षक पुष्परचना व विद्युतरोषणाई देखील करण्यात आली.
दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, कार्यकारी विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, खजिनदार अॅड.रजनी उकरंडे, उत्सवप्रमुख सुनिल रुकारी, उत्सव उपप्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त महेंद्र पिसाळ, अॅड.शिवराज कदम जहागिरदार, डॉ. पराग काळकर, युवराज गाडवे आदींनी उत्सवाचे आयोजन केले होते. Avdhut chitan Gurudev Datta

रविवारी सकाळी ६ वाजता विश्वस्त डॉ. पराग काळकर व कुटुंबियांच्या हस्ते लघुरुद्र झाला. त्यानंतर सकाळी ८ वाजता अध्यक्ष राजेंद्र बलकवडे वत्यांच्या पत्नी सौ. हेमलता व मुलगा आर्य आदी कुटुंबियांच्या हस्ते दत्तयाग संपन्न झाला. तर, सकाळी ८.३० वाजता आमदार रवींद्र धंगेकर व प्रतिभा धंगेकर यांच्या हस्ते प्रात:आरती झाली. प्रख्यात वादक शिवमणी हे देखील दर्शनाकरिता आले होते. त्यांनी वाद्यवादन करुन दत्तमहाराजांच्या चरणी स्वराभिषेक केला.
गुरुपौर्णिमा उत्सवात पीडीसीसी बँकेचे समीर व सौ. गीता रजपूत यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता व दुपारी २ वाजता तेलाचे व्यापारी पंकज, राहुल तसेच प्रियंका व प्रीती नहार यांच्या हस्ते दत्तयाग झाला.
मुख्य माध्यान्ह आरती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी, अर्चना गोसावी, क्रितिका व गुंजन तसेच बांधकाम व्यावसाईक पुनीत बालन व ज्येष्ठ उद्योजक विठ्ठलशेठ मणियार यांच्या हस्ते दुपारी १२.३० वाजता सुमारे एक हजार भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
सायं आरतीसाठी मंदिरातर्फे सन २०२४ च्या लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार देण्यात येणाऱ्या पत्रकार अर्चना मोरे व भारतीय महिला बेसबॉल संघाची कप्तान रेश्मा पुणेकर यांच्या हस्ते पार पडली. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॅा. मनोहर चासकर शेजारती साठी उपस्थित. रात्री १०.३० ते ११.३० यावेळेत मंदिरात पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ८ ते दुपारी १ यावेळेत मंदिरासमोरील उत्सव मंडपात भाविकांनी स्वहस्ते अभिषेक केले. तसेच दिवसभर बुंदी व फळांच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. सप्ताहात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम व भजनाचे कार्यक्रम देखील पार पडले