28.4 C
New Delhi
Wednesday, July 2, 2025
Homeताज्या बातम्यावरुणराजा जोमात;बळीराजा कोमात

वरुणराजा जोमात;बळीराजा कोमात

अनेक जिल्ह्यात तुफान पाऊस

पुणे- उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना एकीकडे दिलासा मिळत असला तरी दुसरीकडे मात्र पावसाने हाहाकार माजवत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी वीज पडण्याच्या घटना घडल्या आहेत. राज्यात सोलापूर, लातूर, माढ्यासह वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावलीये. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून चाकूर येथे वीज पडून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी दुःखद घटना घडली आहे.  शिवाजी नारायण गोमचाळे आणि ओंकार लक्ष्मण शिंदे असे मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.  

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळ प्रचंड नुकसान झालं आहे. माढा तालुका परिसरात साधारणत अर्धा तास तीव्र स्वरूपाचं वादळ होतं. समोरच काहीच दिसत नव्हत. यामध्ये मोठं मोठी झाडं उन्मळून पडली आहेत. घरांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतीच्या पिकांच, जनावरांच, विजेच्या खांबांचं मोठं नुकसान झालं आहे. 30 ते 35  वर्षापासून असलेली आंब्याची झाडं डोळ्यादेखत उन्मळून पडली आहेत.सोलापुरात ढगांच्या गडगडाटसह सोलापूर शहर आणि परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नई जिंदगी परिसरातील नागनाथ नगर येथील अनेक घरावरचे पत्रे उडाले आहेत. जोरदार वादळी वाऱ्यामुळे दहा ते पंधरा घरांचे नुकसान झाले असून अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांची चिंता देखील वाढली आहे.

उष्ण वातावरणानंतर आज संध्याकाळच्या सुमारास वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यामध्ये अनेक भागात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.  त्यामुळे उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना काही प्रमाणात का होईना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. वाशीमसह बुलढाण्यातही सायंकाळी अचानक आलेल्या वादळामुळे व अवकाळी पावसाने आसलगाव येथे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या शेतमालाचं मोठं नुकसान झाले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
28.4 ° C
28.4 °
28.4 °
77 %
2.7kmh
21 %
Wed
38 °
Thu
40 °
Fri
38 °
Sat
36 °
Sun
35 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!