35.9 C
New Delhi
Friday, July 4, 2025
Homeताज्या बातम्याविठ्ठल रूक्मिणी मंदिरास 53 कोटी 97 लाखाचे दान

विठ्ठल रूक्मिणी मंदिरास 53 कोटी 97 लाखाचे दान

पंढरपूर – विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस दिनांक 01 जानेवारी ते 27 डिसेंबर 2024 या कालावधीत 53 कोटी 97 लाखाचे दान प्राप्त झाल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

मंदिर समिती मार्फत भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. त्यामध्ये प्रामुख्याने दर्शनरांग व्यवस्थापन, अन्नछत्र, लाडूप्रसाद, निवास इत्यादीचा समावेश आहे. याशिवाय, भाविकांना श्रींच्या नित्यपुजा, पाद्यपुजा व तुळशीपूजा देखील भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. यात्रा कालावधीत भाविकांच्या पायांना खडे टोचू नये म्हणून दर्शनरांगेत मॅटींग, विश्रांती कक्ष, आपत्कालिन दरवाजे, हिरकणी कक्ष, मोफत अन्नछत्र, एकादशीला शाबुदाणा खिचडी वाटप, द्वादशीला तांदळाची खिचडी, मिनरल वॉटर, चहा, आरोग्य व्यवस्थेचे स्टॉल इ. उपक्रम मंदिर समितीने सुरू केले आहेत. तसेच श्रींच्या पुजेसाठी वाढती मागणी विचारात घेऊन, नित्यपुजेत २ भाविक कुटुंबियांना संधी, अन्नछत्र सहभाग योजना, महानैवेद्य सहभाग योजना, तुळशी अर्चन पुजा सुरू केल्या असून, त्याची नोंदणी देखील ऑनलाईन करण्यात आली आहे, यास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मंदिर समितीस वारकरी भाविकांकडून चांगले दान मिळत असून, मिळालेल्या दानातून श्रींच्या दर्शनासाठी येणा-या वारकरी भाविकांना चांगल्या व अत्याधुनिक सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील असे यावेळी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगीतले.

श्रींच्या चरणाजवळ 62589797/-, लाडूप्रसादातून 58526900/-, देणगीतून 81898417/-, भक्तनिवासातून 98478279/-, पुजेतून 23386312/-, फोटो, मोबाईल लॉकर व महावस्त्रातून 9233049/-, हुंडीपेटीतून 75674052/-, सोने-चांदीमधून 27204450/- परिवार देवता मंदिरातून 30914203/-, विधि उपचारातून 5988437/- तसेच इतर जमेतून 65811856/- असे एकूण 53 कोटी 97 लाख 5 हजार 752 रूपये इतके उत्पन्न मिळाले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
35.9 ° C
35.9 °
35.9 °
60 %
1.7kmh
84 %
Fri
36 °
Sat
42 °
Sun
39 °
Mon
32 °
Tue
35 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!