21.1 C
New Delhi
Sunday, March 23, 2025
Homeताज्या बातम्यासलग तीन वर्षे नियमित कर भरल्यास चौथ्या वर्षीच्या करामध्ये नियमित करसवलती व्यतिरिक्त...

सलग तीन वर्षे नियमित कर भरल्यास चौथ्या वर्षीच्या करामध्ये नियमित करसवलती व्यतिरिक्त २ टक्क्यांची सवलत !

खंड न पाडता कराचा भरणा करुन सवलतीचा लाभ घ्यावा; करसंकलन विभागाचे आवाहन

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून पिंपरी – चिंचवड pcmc शहरातील मालमत्ताधारकांना थकीत कराचा भऱणा करण्याचे आवाहन विविध माध्यमातून वारंवार करण्यात येत आहे. त्याबरोबरच, शहरातील थकबाकीदारांच्या यादीमध्ये असणाऱ्या शाळा, हॉटेल, ह़ॉस्पिटल, कारखाने, मॉल यासारख्या व्यावसायिक मालमत्तांवर जप्तीची कारवाई सुध्दा करण्यात येत असून आत्तापर्यंत जवळपास ७५७ मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली असून ज्यांनी जप्त मालमत्तेचा थकीत कर आज अखेर महानगरपालिकेकडे जमा केलेला नाही अशा जप्त मालमत्तांवर लिलावाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. याबाबत लवकरच लिलावाची जाहीर सूचना प्रसिध्द करण्यात येणार आहे. सबब, ज्या मालमत्ताधारकांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे अशा मालमत्ता धारकांनी दि. २५/०२/२०२५ पुर्वी संपुर्ण कराची थकबाकी महानगरपालिकेकडे जमा करावी. सबब, करसंकलन tax विभागाकडून ज्यांचा कर थकीत आहे अशा मालमत्तांवर जप्तीची कारवाई व जे मालमत्ताधारक नियमित कराचा भरणा करतात अशा मालमत्ताधारकांना मालमत्ताकरावर सवलत सुध्दा देत आहे. यामध्ये जे नागरिक नियमितपणे सलग ३ वर्षे कराचा भरणा करित आहेत अशा करदात्यांस चौथ्या वर्षी मालमत्ता करामध्ये अतिरिक्त २ टक्क्यांची सवलत देण्यात येते. चालू वर्षामध्ये अशा काही नियमितपणे कर भरणाऱ्या काही करदात्यांनी अद्यापही मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही. त्यामुळे अशा नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरणामध्ये खंड न पाडता थकीत मालमत्ताकर भरुन नियमित १० टक्के सवलतीबरोबरच अधिकच्या २ टक्क्यांच्या सवलतीसाठी पात्र ठरण्यासाठी चालू वर्षाचा मालमत्ताकर बिलाची रक्कम त्वरित भरुन लाभ घ्यावा. असे आवाहन करसंकलन विभागाकडून मालमत्ताधारकांना करण्यात आले आहे.


चालू आर्थिक वर्षामध्ये ४ लाख ८६ हजार ९६१ इतक्या मालमत्ताधारकांनी आत्तापर्यंत ७३० कोटींच्या कराचा भरणा केला आहे. तथापी सुमारे ३ लाख २१ हजार इतक्या मालमत्ताधारकांनी ३३५ कोटी इतकी रक्कम २०२३-२४ या वर्षात जमा केली. मात्र, यातील ६९ हजार मालमत्ताधारकांनी चालूवर्षी कराचा भरणा अद्यापही महानगरपालिकेकडे केलेला नाही. सबब, या मालमत्ताधारकांनी चालूवर्षी कराचा भरणा न केल्यास त्यांस अतिरिक्त २ टक्क्यांची सवलतीस ते पात्र ठरणार नाहीत. ज्या नागरिकांनी नियमितपणे कराचा भरणा केला आहे अशा नागरिकांनी चालूवर्षी खंड न पाडता कराचा भरणा करुन सवलतीचा लाभ घ्यावा असे करसंकलन विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.

कोट – नियमितपणे कराचा भरणा करणाऱ्या करदात्यांना प्रोत्साहनपर २ टक्क्यांची सवलत…
सलग ३ वर्षे नियमितपणे कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना चौथ्या वर्षीच्या मालमत्ताकरामध्ये सवलतीव्यतिरिक्त अधिकच्या २ टक्क्यांची प्रोत्साहनपर सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे नियमित कराचा भरणा करणाऱ्या मालमत्ताधारकांनी चालू वर्षी अद्यापही कराचा भरणा केला नसेल तर अशा मालमत्ताधारकांना सलग तीन वर्षे नियमित कर भरल्यानंतर चौथ्या वर्षीच्या मालमत्ताकरावर देण्यात येणारी २ टक्क्यांची सवलत मिळणार नाही. त्यामुळे जे मालमत्ताधारक आपल्या कराचा नियमितपणे भरणा करतात अशा मालमत्ताधारकांनी कर भरण्यामध्ये खंड न पाडता आपल्या थकीत कराचा भरणा केला तर ते २ टक्क्यांच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत.

  • अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
21.1 ° C
21.1 °
21.1 °
64 %
1kmh
0 %
Sat
25 °
Sun
34 °
Mon
37 °
Tue
39 °
Wed
39 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!