आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल च्या मदर ॲन्ड चाईल्ड केअर विभागातर्फे आयोजित ‘स्प्लॅश ऑप कलर्स’ या पावसाळी चित्रकला स्पर्धेत पीसीएमसी भागातील १००० हून अधिक मुलांचा सहभाग
पुणे – आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या मदर ॲन्ड चाईल्ड केअर युनिट तर्फे रविवार २१ जुलै २०२४ रोजी स्प्लॅश ऑफ कलर्स’ या पावसाळी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला १हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला होता. यावेळी ३-४ वर्षे, ५-९ वर्षे आणि १०-१५ वर्षे वयोगटातील मुलांनी भाग घेतला. या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे प्रसार करणे होय.
या स्पर्धेच्या माध्यमातून सहभागी झालेल्या लहान मुलांनी आपली कलात्मकता आणि सृजनशीलता प्रत्येकाने आपल्या आकर्षक रंगांनी आणि पावसाळ्याशी संबंधित चित्रे काढली. आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या मदर ॲन्ड चाईल्ड केअर डिपार्टमेंट तर्फे आयोजित या कार्यक्रमात मुलांना आकर्षित करणारे जादूचे प्रयोग, नृत्याचे कार्यक्रम आणि टॅटू कलाकार यांनी मुलांचा वेळ आनंदात गेला.
बालरोग विभागाच्या संचालिका डॉ. प्रिया मानकरे यांनी समाजाच्या भल्यासाठी हॉस्पिटलच्या वचनबध्दतेवर भर दिला. या कार्यक्रमा दरम्यान डॉ. मानकरे यांनी उपस्थितांना पावसाळ्यातील आरोग्य विषयक काळजी आणि लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित करत मुले आणि पालकांमध्ये जागरुकता निर्माण केली.
यावेळी बोलतांना आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे सीईओ श्री. पमेश गुप्ता यांनी आनंद व्यक्त केला, ते म्हणाले “ समाजाच्या भल्याचा विचार करणे हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. चित्रकला स्पर्धा हे कलात्मकता आणि सामाजिक एकतेचे उत्तम उदाहरण ठरले. संपूर्ण दिवसभराच्या भरगच्च कार्यक्रमाचा आनंद घेत मुलांनी दाखवलेल्या त्यांची कला पाहणे एक आनंददायी अनुभव होता.”
या चित्रकला स्पर्धेचा निकाल हा ३१ जुलै २०२४ रोजी घोषित करण्यात येणार आहे. पहिल्या १० चित्रांना आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल च्या बालरोग विभागात लावण्यात येणार असून या माध्यमातून मुलांच्या कुशलता आणि कलात्मकतेचे कौतूक करण्यात येणार आहे.
कलात्मक मंचाच्या माध्यमातून आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल ने मुलांच्या सर्वसमावेशक विकासात आपले योगदान देण्यावर लक्ष्य केंद्रित केले आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे मुलांची कुशलता वाढीस लागून मुलांना मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य सुधारण्यावर भर दिला आहे, कारण या गोष्टी बालरोग क्षेत्रातील महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
या कार्यक्रमाने आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे सर्जनशील सहभाग आणि मुलांच्या आरोग्य आणि विकासासाठी समर्थनाद्वारे समुदायाचे कल्याण वाढवण्याच्या समर्पणावर प्रकाश टाकला.