34.8 C
New Delhi
Sunday, July 13, 2025
Homeताज्या बातम्या४२ व्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचे उदघाटन

४२ व्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचे उदघाटन

ज्योतिषशास्त्रात ज्ञानप्राप्तीची लालसा धरा :डॉ.दत्तप्रसाद चव्हाण


पुणे:-भालचंद्र ज्योतिर्विद्यालय आणि प्रा.रमणलाल शहा ज्योतिष अॅकॅडमी आयोजित ४२ व्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचे उद्घाटन दि.२० ऑगस्ट रोजी सकाळी पुण्यात झाले.सकाळी ९ वाजता अधिवेशनाचे उद्घाटन डॉ.दत्तप्रसाद चव्हाण यांच्या हस्ते ,चंद्रकांत शेवाळे ,डॉ.सुनीता पागे,डॉ.त्रिशला शेठ,डॉ.नितीन गोठी यांच्या उपस्थितीत झाले .याच दिवशी डॉ.सीमा देशमुख यांच्या योगीराज वास्तू या संस्थेस ‘बेलसरे कार्यगौरव पुरस्कार’ देण्यात आला. चंद्रकांत शेवाळे,कैलास केंजळे ,सौ.सीमा देशमुख,अॅड. सुनीता पागे,कांतीलाल मुनोत,मोहन फड़के,जकातदार,प्रवीण पंडीत,गणेश दुबे, उमेश घीवाला, डॉ.जयश्री बेलसरे,सौ.पुष्पलता शेवाळे, विजय बाफना, मिलिंद चिंधडे आदी उपस्थित होते .भालचंद्र ज्योतिर्विद्यालयचे संस्थापक चंद्रकांत शेवाळे यांनी स्वागत केले .गौरी केंजळे यांनी सूत्रसंचालन केले.

दि.२०,२१ ऑगस्ट रोजी उद्यान प्रसाद मंगल कार्यालय(सदाशिव पेठ) येथे हे दोन दिवसीय अधिवेशन सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत होत असून २० संस्थांचा या अधिवेशनाच्या आयोजनात सहभाग आहे.देशभरातून नामवंत ज्योतिर्विद या अधिवेशनात सहभागी आहेत.या अधिवेशनात विविध ज्योतिष विषयांवर देशभरातील तज्ज्ञांची चर्चासत्रे, प्रदर्शन, स्पर्धा ,पुस्तक प्रदर्शन आणि मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.वास्तुतज्ज्ञ कैलास केंजळे,नवनीत मानधनी हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.

‘ज्योतिष हे पुरातन शास्त्र असून त्याचा निश्चित उपयोग होतो.ज्योतिष शास्त्रात पारंगत होण्यासाठी प्राचीन ग्रंथांचे अध्ययन करा, ज्ञान प्राप्तीची लालसा धरा.प्रसिद्धीच्या मागे लागण्याची गरज नाही.सिध्दी प्राप्त करा’,असे प्रतिपादन उदघाटक डॉ. दत्तप्रसाद चव्हाण यांनी केले .डॉ.मोहन फड़के म्हणाले, ‘ भविष्यकाळाच्या पोटात डोकावणे हे ज्योतिषाचे काम आहे . विश्वातील उर्जा आपल्या कुंडलीतून शोधणे , हे ज्योतिषाचे काम आहे ‘. डॉ.त्रिशला शेठ यांनीही मनोगत व्यक्त केले.डाऊजिंग ,ज्योतिष दर्पण , रेकी अशा अनेक पुस्तकांचे प्रकाशन झाले.

दि.२१ ऑगस्ट म्हणजे अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील विविध मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले असून आण्णा बन्ने,प्रिया मालवणकर,डॉ.चंद्रकला जोशी,लाल किताब ज्योतिष पद्धतीचे मार्गदर्शक राजकुंवर करवाल यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.सौ.शुभांगिनी पांगारकर (नाशिक) यांना ग्रहांकित जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे तर कै.शीलाताई पाचारणे स्मृती आदर्श ज्योतिष शिक्षिका पुरस्कार सौ.गौरी केंजळे यांना देण्यात येणार आहे.अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील ज्योतिषविषयक पुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहे.

   

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
34.8 ° C
34.8 °
34.8 °
47 %
3.1kmh
85 %
Sun
35 °
Mon
39 °
Tue
35 °
Wed
37 °
Thu
35 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!