28.1 C
New Delhi
Tuesday, November 12, 2024
Homeताज्या बातम्या४४ नामनिर्देशन अर्जांपैकी ३९ अर्ज वैध

४४ नामनिर्देशन अर्जांपैकी ३९ अर्ज वैध

४ उमेदवारांची उमेदवारी अवैध

पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिका ग क्षेत्रीय कार्यालय, तिसरा मजला, थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये विहित मुदतीत ३२ उमेदवारांनी ४४ नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. या नामनिर्देशन पत्रांची आज छाननी प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी यावेळी वैध आणि अवैध ठरलेल्या नामनिर्देशन पत्रांची घोषणा केली.चिंचवड विधानसभा मतदारसंघ निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने दाखल केलेल्या ४४ नामनिर्देशन अर्जांपैकी ३९ अर्ज वैध ठरले आहेत व ५ अर्ज अवैध ठरले आहेत. ३२ उमेदवारांनी ४४ नामनिर्देशन पत्रे दाखल केली होती. त्यापैकी ४ उमेदवारांची उमेदवारी अवैध ठरली आहे.

वैध उमेदवारांची यादी :-
रफिक रशिद कुरेशी, सचिन वसंत सोनकांबळे, सचिन अरूण सिद्धे, अतुल गणेश समर्थ, काटे विठ्ठल कृष्णाजी, ऍड. अनिल बाबू सोनवणे, भाऊसाहेब सोपानराव भोईर, शंकर पांडुरंग जगताप, काळे सतिश भास्कर, राजेंद्र मारूती काटे, विनायक सोपान ओव्हाळ, रुपेश रमेश शिंदे, रविंद्र विनायक पारधे, धर्मराज अनिल बनसोडे, संदिप गुलाबराव चिंचवडे, मारूती साहेबराव भापकर, भरत नारायण महानवर, अरूण श्रीपती पवार, मयुर बाबु घोडके, सिद्धिक इस्माइल शेख, जावेद रशिद शेख, करण नानासाहेब गाडे, शिवाजी तुकाराम पाडुळे, राहुल तानाजी कलाटे, जितेंद्र प्रकाश मोटे, सिमा देवेंद्रसिंग यादव, राजेंद्र पुंडलिक गायकवाड, राजेंद्र आत्माराम पवार.

अवैध उमेदवारांची यादी :-
अश्विनी लक्ष्मण जगताप, आनंद सुरेश मोळे, जितेंद्र रामचंद्र वाडघरे, जसविंदर सिंग इंदूपाल सिंग रत्तू.

चिंचवड विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निरीक्षक श्री. मनवेश सिंग सिद्धू यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या छाननी प्रक्रियेवेळी नामनिर्देशन पत्रे दाखल करणारे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.निवडणूकीच्या अनुषंगाने कोणत्याही तक्रारी नोंदविण्यासाठी निवडणूक निरीक्षक श्री. मनवेश सिंग सिद्धू यांच्या generalobserver205chinchwad@gmail.com या ईमेल आयडीवर तक्रार करता येईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
28.1 ° C
28.1 °
28.1 °
51 %
2.1kmh
1 %
Tue
32 °
Wed
32 °
Thu
32 °
Fri
32 °
Sat
32 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!