पिंपरी : मालमत्ता कर न भरलेल्या आणि कराची दहा हजारांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ७५ हजार ८५८ मालमत्ताधारकांनी महापालिकेचा ७१७ कोटी ३२ लाख रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. या मालमत्ताधारकांना देयकाबरोबरच जप्तीपूर्व नोटिसा देण्यास कर संकलन आणि कर आकारणी विभागाने सुरुवात केली आहे.पिंपरी-चिंचवड शहरात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मोकळी जमीन, मिश्र यांसह विविध अशा सहा लाख २५ हजार मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांकडून कर संकलन विभागाच्या वतीने कर वसूल करण्यात येतो. सरत्या २०२३-२४ या आर्थिक वर्षात सहा लाख २५ हजार मालमत्तांपैकी पाच लाख ११ हजार १५४ मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला. ९७७ कोटी ५० लाख रुपयांचा कर तिजोरीत जमा झाला. मात्र, ७५ हजार ८५८ मालमत्ताधारकांनी महापालिकेचा ७१७ कोटी ३२ लाख रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे.
७६ हजार मालमत्ताधारकांकडे ७१७ कोटींचा कर थकीत
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून नोटिसा
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
42.9
°
C
42.9
°
42.9
°
36 %
0.7kmh
0 %
Sun
45
°
Mon
43
°
Tue
43
°
Wed
45
°
Thu
42
°