25.1 C
New Delhi
Saturday, April 18, 2026
Homeताज्या बातम्याउत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने समीर देसाई यांचा गौरव

उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने समीर देसाई यांचा गौरव

सांगली-मिरज : पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ (मुंबई) डिजिटल मीडिया, पुणे अध्यक्ष समीर देसाई यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार खासदार तथा सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सांगली-मिरज येथील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट येथे आयोजित कार्यक्रमात हा सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे, ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक संजय भोकरे तसेच News18 चे संपादक मंदार फणसे, ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन चे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे उपस्थित होते.

समीर देसाई यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने प्रभावी लेखन व वृत्तांकन केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी समीर देसाई यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
25.1 ° C
25.1 °
25.1 °
65 %
1.5kmh
40 %
Fri
32 °
Sat
40 °
Sun
41 °
Mon
40 °
Tue
41 °

Most Popular

Recent Comments