31.9 C
New Delhi
Tuesday, June 10, 2025
Homeताज्या बातम्या"कोल्हापुरात सत्ता-संस्थांवर नविद मुश्रीफ यांचा ठसा"

“कोल्हापुरात सत्ता-संस्थांवर नविद मुश्रीफ यांचा ठसा”

कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, अर्थात ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदावर अखेर नविद मुश्रीफ यांची निवड झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या अध्यक्षपदाभोवती राजकीय घडामोडी आणि चर्चा रंगल्या होत्या. माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर नेतृत्वाच्या शर्यतीत अनेक दिग्गजांची नावे चर्चेत होती. अखेर निर्णायक बैठकीत नविद मुश्रीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

नविद मुश्रीफ हे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र असून, आता ते ‘गोकुळ’च्या प्रमुखपदी विराजमान झाले आहेत. विशेष म्हणजे, प्रारंभी हसन मुश्रीफ यांनी या निवडीला विरोध दर्शवला होता. मात्र, अखेर त्यांच्याच मुलाच्या नावावर अंतिम निर्णय झाला. त्यामुळे या निवडीमागे राज्य पातळीवरील हस्तक्षेप आणि महायुतीतील अंतर्गत राजकीय समीकरणे स्पष्टपणे दिसून आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निवडीत थेट लक्ष घातल्याने, महायुतीचा अध्यक्ष असावा, अशी भूमिका पुढे आली. त्यामुळे संस्थापक आनंदराव पाटील चुयेकर यांचे पुत्र शशिकांत पाटील चुयेकर यांचे नाव मागे पडले आणि नविद मुश्रीफ यांच्या नावावर एकमत झाले.

या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्ष दालनात तब्बल अडीच तास बैठक झाली. वरिष्ठ नेत्यांनी सविस्तर चर्चा करून नाव ठरवले आणि ते बंद लिफाफ्यात सुपूर्त केले. आज हा लिफाफा उघडून नविद मुश्रीफ यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. नविद मुश्रीफ परदेशात असल्याने त्यांना तातडीने कोल्हापुरात बोलावण्यात आले होते, यावरून त्यांच्या नावाची चर्चा आधीच जोरात होती.या निवडीमुळे कोल्हापुरातील सत्ता-संस्थांवर मुश्रीफ कुटुंबाची पकड अधिक बळकट झाली आहे, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
31.9 ° C
31.9 °
31.9 °
21 %
3.6kmh
0 %
Tue
44 °
Wed
46 °
Thu
47 °
Fri
47 °
Sat
44 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!