35.4 C
New Delhi
Tuesday, June 23, 2026
Homeताज्या बातम्यासंचेती चौकातील वाहतूक कोंडी सुटणार

संचेती चौकातील वाहतूक कोंडी सुटणार

वाय-आकाराचा’ नवा उड्डाणपूल ठरणार गेमचेंजर

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने मास्टर प्लॅन तयार केला असून, संचेती हॉस्पिटल चौक आणि शिमला ऑफिस चौकातील ‘बॉटलनेक’ स्थिती दूर करण्यासाठी नवीन वाय-आकाराचा उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे विद्यापीठ चौकात बहुमजली उड्डाणपूलाचे काम सुरू असताना, पुढील टप्प्यात निर्माण होणारी कोंडी टाळण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेकडून गणेशखिंड रस्ता ४५ मीटर रुंद करण्यात आला असला, तरी शिमला ऑफिस चौक आणि संचेती हॉस्पिटल चौकात मेट्रोचे स्थानक व खांब रस्त्याच्या मध्यभागी असल्याने या दोन्ही ठिकाणी वाहतुकीची मोठी अडचण निर्माण झाली आहे. विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर या कोंडीत आणखी भर पडण्याची शक्यता लक्षात घेऊन, विद्यापीठ रस्त्याने येणारी वाहने कृषी महाविद्यालय चौकातून डावीकडे वळवून जुना पुणे–मुंबई महामार्ग आणि संगमवाडीच्या दिशेने नेण्यासाठी स्वतंत्र उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

हा प्रस्तावित उड्डाणपूल साखर संकुलपासून न. ता. वाडी येथील भुयारी मार्गावरून जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ७५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, महापालिकेच्या अंदाज समितीने या पुलास मान्यता दिली आहे. लवकरच या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या प्रकल्प विभागाकडून देण्यात आली आहे.

कृषी महाविद्यालय ते संचेती हॉस्पिटलदरम्यान आधीच असलेला उड्डाणपूल आणि त्यानंतर सुरू झालेला मेट्रो प्रकल्प यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी अधिक तीव्र झाली आहे. फर्गसन रस्ता आणि बाजीराव रस्त्याने शिमला ऑफिसकडे येणारी वाहने जुना पुणे–मुंबई महामार्ग आणि पुणे स्टेशनकडे जाण्यासाठी या चौकांत एकवटतात. या मार्गावर राहुल सिनेमासमोर उड्डाणपूल, त्यानंतर आकाशवाणीसमोर मेट्रो मार्ग क्रमांक ३ चे स्थानक आणि पुढे संचेती हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावर मेट्रोचे खांब असल्याने रस्त्याची वहन क्षमता मोठ्या प्रमाणात घटली आहे.

सध्या साखर संकुलकडून जुना पुणे–मुंबई महामार्गाकडे जाण्यासाठी असलेला भुयारी मार्ग केवळ दुचाकी वाहनांसाठीच वापरात असल्याने चारचाकी वाहनांना संचेती चौकातूनच जावे लागते. त्यामुळे दिवसभर या चौकांत वाहतूक कोंडी कायम असते.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने भुयारी मार्गाच्या वरून वाय-आकाराचा उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा पूल साखर संकुलसमोरून थेट जुना पुणे–मुंबई महामार्ग तसेच संगमवाडीकडे जाण्यासाठी स्वतंत्र लेन उपलब्ध करून देणार आहे. तर भुयारी मार्ग फक्त शहरात येणाऱ्या वाहनांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. या नव्या व्यवस्थेमुळे संचेती आणि शिमला ऑफिस चौकातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
35.4 ° C
35.4 °
35.4 °
25 %
3.3kmh
48 %
Mon
35 °
Tue
42 °
Wed
39 °
Thu
42 °
Fri
43 °

Most Popular

Recent Comments