23.1 C
New Delhi
Saturday, March 22, 2025
Homeमनोरंजनअत्तरचा दरवळ इजिप्तमध्ये….

अत्तरचा दरवळ इजिप्तमध्ये….

आंतरराष्ट्रीय महोत्सवात लघुपटाची निवड

ईशान्य आफ्रिकेतील इजिप्त देशातील महत्वाचा मानला जाणारा ब्रिटिश यूनिवर्सिटी इंटरनेशनल स्टूडेंट्स फिल्म फेस्टिवल २०२४ मध्ये “अत्तर ”  या कलाकृतीची निवड झाली असून ही गोष्ट देशाबरोबर महाराष्ट्रासाठी आणि चित्रपटसृष्टीला अभिमानाची ठरली आहे. हा चित्रपट महोत्सव ए. आय. शोरूक, न्यू कैरो, गव्हर्नरेट, इजिप्त या ठिकाणी १४ ऑक्टोंबर रोजी पार पडणार आहे. गटारात (मॅनहोल) मध्ये काम करणाऱ्या कामगारांचा प्रश्न हा जगभर आहे. गटारात काम करणाऱ्या वडिलांना एक अत्तराची बाटली मुलीला द्यायची आहे. गटारात काम करणाऱ्या वडिलांच्या आयुष्यात सुगंधाची दरवळ आणण्यासाठी त्या मुलीच्या संघर्षाची कहाणी ‘अत्तर’  यामध्ये दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांनी मांडली  आहे.

ब्रिटिश यूनिवर्सिटी इंटरनेशनल स्टूडेंट्स फिल्म फेस्टिवलमध्ये अत्तरची निवड होणे याचा खूप आनंद आहे. आम्ही केलेल्या कलाकृतीला जगाच्या पाठीवर निवड होणे. त्यांना आवडणे आमच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. असे चित्रपट दिग्दर्शक रामकुमार शेडगे आणि निर्माते राजू लुल्ला यांनी सांगितले. अत्तरमध्ये बालकलाकाराच्या प्रमुख भूमिकेत मीरा शेडगे आपल्याला पाहावयास मिळणार आहे. या अगोदर आपल्याला मीरा काही जाहिरातीमध्ये काम करताना दिसली होती. अत्तर या लघुपटाची निर्मिती राजू लुल्ला यांनी केली आहे.

द डार्क शॅडो मोशन पिक्चर्स प्रस्तुत आणि रुहानी म्युझिक निर्मित असलेल्या ‘अत्तर’चे रामकुमार गोरखनाथ शेडगे यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेली ही कलाकृती असून माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ‘अत्तर’ खूप महत्वाची भूमिका बजावत असते. ‘अत्तर’ जणू माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. ‘ म्हटलं की सुंगदाची दरवळ हेच ‘अत्तर’ अनेकांचे आयुष्य सुगंधी करते.  सुगंधी ‘अत्तराची अस्वस्थ करणारी गोष्ट दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांनी मांडली आहे.  जगभरातील ६० देशात “अत्तर” लघुपटाचा दरवळ रसिकांपर्यंत पोहचला आहे. अजून जगभरातील कानाकोऱ्यातील लघुपट महोत्सवात अत्तर लघुपट गेला असून रसिकांच्या ह्रदयाचा ठाव घेणारं आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
23.1 ° C
23.1 °
23.1 °
53 %
1kmh
0 %
Sat
26 °
Sun
35 °
Mon
37 °
Tue
39 °
Wed
39 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!