पुणे : कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने चित्रपट कला, सांस्कृतिक, फॅशन, बिजनेस, डॉक्टर,पत्रकार, समाजसेवा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना ‘ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया 2024’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एलप्रो सभागृह, एलप्रो मॉल, चिंचवड येथे हा पुरस्कार समारंभ पार पडला. पुरस्कार सोहळ्याचे हे पाचवे वर्ष होते. यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, सूर्यादत्ता ग्रुपचे चेअरमन डॉ. संजय चोरडिया, सुषमा चोरडिया आणि कशिश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष आणि पुण्याचे ‘पॅड मॅन’ योगेश पवार उपस्थित होते. यावेळी विनोदी अभिनेते समीर चौगुले, अभिनेता हार्दिक जोशी, चिन्मय उदगीरकर, हर्षद अत्तकरी, अभिनेत्री सुरूची अडारकर – रानडे, ‘चला हवा येऊ द्या फेम’ योगेश शिरसाट, लेखक दिग्दर्शक मिलिंद शिंत्रे आणि आरजे संग्राम ‘ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया 2024’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच भारतीय लष्करात देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना अपंगत्व आलेले जवान सदाशिव घाडगे यांचा विशेष पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.याविषयी बोलताना योगेश पवार म्हणाले, कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने आम्ही सातत्याने महिलांच्या आरोग्या विषयक विविध उपक्रम राबवित असतो. या शो मधून जमा झालेला निधी महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृती मोहिमेसाठी वापरला जाणार आहे.अल्विरा मोशन एन्टरटेन्मेंट च्या दिपाली कांबळे म्हणाल्या, या कार्यक्रमाच्या निमत्ताने एका चांगल्या उपक्रमशी जोडली गेली याचा आनंद होतो आहे. कलावंताच्या सन्माना बरोबरच महिलांच्या आरोग्यासाठीही कशिश फाऊंडेशन चांगले उपक्रम राबवित आहे हे कौतकास्पद आहे.शो डायरेक्टर पूजा वाघ ह्यांनी देखील सगळ्या मान्यवरांचे त्यांच्या विशेष कार्याचे कौतुक करताना अभिनंदन केले.तसेच या प्रसंगी कष्टकरी महिलांना सॅनेटरी पॅड चे वाटप करण्यात आले.