19.1 C
New Delhi
Tuesday, January 21, 2025
Homeमनोरंजन‘जनरेशन ग्रीन’ अभियाना अंतर्गत देशभरातील कॉलेजांमध्ये ई-कचरा जागरूकता मोहीमेस सुरुवात

‘जनरेशन ग्रीन’ अभियाना अंतर्गत देशभरातील कॉलेजांमध्ये ई-कचरा जागरूकता मोहीमेस सुरुवात

पुणे : ऑल इंडिया काऊंसिल फॉर टेक्निकल एड्युकेशन आणि ओप्पो इंडिया यांनी रामजस कॉलेज, दिल्ली विद्यापीठात राष्ट्रव्यापी एलेक्ट्रॉनिक-कचरा जागरूकता मोहीमेद्वारा आपल्या ‘जनरेशन ग्रीन’ अभियानाचा दुसरा टप्पा सुरू केला. या सह सदर कार्यक्रमांतर्गत हे कॉलेज म्हणजे पहिली ‘इको-सजग चॅम्पियन संस्था’ बनली. पहिल्या टप्प्याचा एक भाग म्हणून ओप्पो इंडिया आणि एआयसीटीई ने देशभरातील कॉलेजांमध्ये इंटर्नशिप्स ऑफर करून तरुणांमध्ये हरित कौशल्यांचा प्रचार केला. १४०० पेक्षा जास्त संस्थांमधून ९००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या इंटर्नशिप्ससाठी अर्ज केला आणि त्यातून ५००० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. हे विद्यार्थी आता जागरूकता सत्रे, ई-सर्वेक्षण, ग्रीन डे सेलिब्रेशन सारख्या प्रत्यक्ष शाश्वत क्रियाकलापांत गुंतले आहेत.

दुसरा टप्पा तरुणांना फेकून दिलेल्या वायर्स, मोबाइल फोन्स, चार्जर्स, बॅटरीज वगैरे इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या व्यवस्थापनाच्या वाढत्या समस्येची समज देतो आणि शाश्वत भविष्यासाठी या कचऱ्याच्या प्रभावी निकालाचे महत्त्व समजावतो. नॅशनल एड्युकेशन टेक्नॉलॉजी फोरम चे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे प्रमुख पाहुणे म्हणून लॉन्च प्रसंगी उपस्थित होते. त्यांच्या व्यतिरिक्त या वेळी श्री. राकेश भारद्वाज, ओप्पो इंडिया येथे पब्लिक अफेअर्सचे प्रमुख आणि रामजस कॉलेज, दिल्ली विद्यापीठाचे प्राचार्य प्रा. अजय कुमार आरोरा तसेच इतर काही मान्यवर हजर होते.

नॅशनल एड्युकेशन टेक्नॉलॉजी फोरमचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे म्हणाले, “आपल्या पर्यावरणीय आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी ई-कचऱ्याचा जबाबदारीपूर्वक निकाल करणे महत्त्वाचे आहे.‘जनरेशन ग्रीन’ अभियानासारखे उपक्रम तरुणांना या समस्येला तोंड देण्यासाठी सक्रिय भूमिका घेण्यास सक्षम बनवतात. तरुण मने शिक्षित करून आणि त्यांच्यात जबाबदारीची जाणीव निर्माण करून आपण एक अशी पिढी तयार करू शकतो, जी शाश्वत प्रथांना प्राधान्य देईल आणि योग्य प्रकारे ई-कचऱ्याचे व्यवस्थापन करून सर्वांसाठी अधिक हरित आणि निरोगी भविष्य घडवण्यात योगदान देईल.

अवघ्या एक महिन्यात, शाळा-कॉलेजातील १ लाखा पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ऊर्जेचा वापर कमी करण्याचा आणि जबाबदारीपूर्वक ई-कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याचा निर्धार केला आहे आणि अशा प्रकारे अधिक शाश्वत जीवनशैलीसाठी ते योगदान देत आहेत. वर्ष २०२४ च्या अखेरपर्यंत कमीत कमी १० लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे या प्रोग्रामचे ध्येय आहे.

ओप्पो इंडियाचे पब्लिक अफेअर्सचे प्रमुख राकेश भारद्वाज म्हणाले, “ओप्पो इंडिया मध्ये आम्ही भारत सरकारच्या नेट-झीरो व्हिजनशी एकनिष्ठ आहोत आणि एका शाश्वत भविष्याकडे घेऊन जाणाऱ्या राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व करत आहोत. या चळवळीला तरुणांचे पाठबळ लाभले आहे. या अभियानात त्यांनी आणलेल्या उत्साह आणि ऊर्जेमधून त्यांचा सक्रिय सहभाग स्पष्ट दिसतो. त्यामुळेच अवघ्या काही आठवड्यांतच १ लाखापेक्षा जास्त हरित शपथा घेण्यात आल्या आहेत. तरुण लोक पुढे येत आहेत, जबाबदारी घेत आहेत आणि पर्यावरणाच्या दृष्टीने जबाबदार जीवनशैली अंगिकारण्याचा मार्ग दाखवत आहेत.

रामजस कॉलेज, दिल्ली विद्यापीठाचे प्राचार्य प्रा. अजय कुमार आरोरा म्हणाले, “ऑप्पो इंडियाच्या ‘जनरेशन ग्रीन’ अभियानाच्या दुसऱ्या चरणाचे लॉन्च करण्यासाठी रामजस कॉलेजची निवड करण्यात आली, हा आमचा सन्मान आहे. शाश्वततेचा ध्यास घेतलेली आमची संस्था आमच्या कॅम्पस कल्चरमध्ये इको-फ्रेंडली प्रथा दाखल करण्यासाठी निरंतर प्रयत्नरत असते. तरुणांमध्ये पर्यावरण संबंधित जबाबदारी विकसित करण्याच्या आमच्या व्हिजनला अनुरूप अशीच ही भागीदारी आहे.

येत्या काही आठवड्यांत, ही ई-कचरा जागरूकता चळवळ सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई, अमिटी युनिव्हर्सिटी, झारखंड, सिल्व्हर ओक युनिव्हर्सिटी, अहमदाबाद, दयानंद सागर युनिव्हर्सिटी, बंगळूर एसआरएम युनिव्हर्सिटी दिल्ली- सोनेपत,जेईसीआरसी युनिव्हर्सिटी, जयपूर इथे होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
19.1 ° C
19.1 °
19.1 °
55 %
4.1kmh
20 %
Tue
25 °
Wed
26 °
Thu
23 °
Fri
24 °
Sat
23 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!