42.9 C
New Delhi
Sunday, June 15, 2025
Homeमनोरंजनपडद्याआड राहून काम करणाऱ्या कलाकारांचाही सन्मान झाला पाहिजे : आ. सुनील शेळके

पडद्याआड राहून काम करणाऱ्या कलाकारांचाही सन्मान झाला पाहिजे : आ. सुनील शेळके

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेच्या वतीने साहित्यिक व कलाकार मेळावा संपन्न


तळेगाव दाभाडे, :- समाजाच्या निकोप वाढीसाठी, स्वास्थ्यासाठी कलांची समृद्धी आवश्यक आहे. म्हणून कलाकारांचे अत्यंत महत्त्व आहे. रंगभूमीवरील कलावंतांसोबतच पडद्याआड राहून काम करणाऱ्या कलाकारांचाही सन्मान व्हायला हवा, अअशी अपेक्षा आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेच्या वतीने तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या रीक्रिएशन हॉलमध्ये मावळ तालुका साहित्यिक व कलाकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार शेळके बोलत होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, नाट्य परिषद तळेगाव शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, नाट्य परिषदेचे विश्वस्त सुरेश साखवळकर, राष्ट्रवादी सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष बाबा पाटील, कलावंत मानधन समितीचे सदस्य कौस्तुभ कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, भाजपाचे अध्यक्ष संतोष दाभाडे, माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके, नाट्यपरिषदेचे कार्याध्यक्ष गणेश काकडे, ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, रंग कर्मी विश्वास देशपांडे, राजेश बारणे, अतुल पवार, संजय वाडेकर आदी उपस्थित होते.


आमदार शेळके म्हणाले की, साहित्यिक, कलाकार यांचे त्या क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन या सर्वांचे मानधन वाढविण्यासाठी राज्य सरकारकडे प्रयत्न करणार आहे. तसेच तळेगावमध्ये अत्याधुनिक नाट्यगृह उभारणीसाठी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे.
भाऊसाहेब भोईर म्हणाले, की तळेगावातील सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने विविध उपक्रम होत असतात. त्यामुळे तळेगाव ही पुणे जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानीच म्हणावी लागेल.
सुरेश धोत्रे म्हणाले यांनी वृद्ध कलाकार, साहित्यिक यांच्यासाठी राज्य शासनाच्या अनेक योजना असून, त्या सर्वांपर्यंत पोहोचायला हव्यात, यासाठी या मेळाव्याचे आयोजन केल्याचे सांगितले.
प्रास्ताविकात पं. सुरेश साखवळकर म्हणाले, की नाट्य परिषदेला अपेक्षित असणारे उपक्रम तळेगावमध्ये सातत्याने चालू असतात. साहित्य व कलाक्षेत्रात बहुमोल कार्य करणाऱ्या गुणीजनांची दखल घेण्याचे महत्त्वाचे काम या मेळाव्याद्वारे केले आहे.
यावेळी गणेश खांडगे, बाबा पाटील, कौस्तुभ कुलकर्णी यांनीही विचार व्यक्त केले.
सूत्रसंचालन प्रा. अशोक जाधव, डॉ.मिलिंद निकम यांनी, तर राजेश बारणे यांनी आभार मानले. मेळावा यशस्वी होण्यासाठी नाट्यपरिषदेचे भूषण गायकवाड, नयनाताई डोळस, संजय वाडेकर, स्वानंद आगाशे, तानाजी मराठे, संकेत खळदे, नितीन शहा, मंजूश्री बारणे यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
42.9 ° C
42.9 °
42.9 °
36 %
0.7kmh
0 %
Sun
45 °
Mon
43 °
Tue
43 °
Wed
45 °
Thu
42 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!