पिंपरी, –
तुझ्या विना वैकुंठाचा, आली माझ्या घरी ही दिवाळी, चल गं सखे चल गं सखे पंढरीला अशा एकाहून एक सरस गीतांनी दिवाळी पहाटचा पहिला दिवस गाजला. निमित्त होते पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान यांच्या वतीने नटसम्राट निळू फुले रंगमंदिरमध्ये दिवाळी पहाटचे.
गणेशाचे प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. दर्दी रसिकांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती. पार्श्वगायिका ज्योती गोराणे, गायिका निकिता बहिरट, गायिका भक्ती कापरे यांनी गायलेल्या, तुझ्या विना वैकुंठाचा, आली माझ्या घरी ही दिवाळी, चल गं सखे चल गं सखे पंढरीला, शिर्डीवाले साईराम, काल काय ऐकलं ते खरं हाय का… लंबी जुदाई, चांदणं चांदणं झाली रात, या गाण्यांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. पहाटेच्या गारव्यातही सभागृह गीतांनी अक्षरशः चिंब झाले होते.
लक्ष्मी कुडाळकरच्या ढोलकीने रसिकांना तालावर नाचायला लावले, टाळ्या, शिट्ट्यानी उत्स्फूर्त दाद दिली.
दर्दी रसिकांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती. त्यांना हार्मोनियमवर पूजा वाणी, ढोलकीवर लक्ष्मी कुडाळकर आणि सहगायिका राधिका साकोरे संगीत साथ केली..
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजू अण्णा जगताप, भरत बालवडकर ह. भ. प. वाघ महाराज, काटे महाराज, स्वानंद महाराज मोरे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, विश्वनाथ शिंदे, शिंदे फौजी, महादेव रोकडे, संदीप राठोड, कविता राजेंद्र जगताप, अभिषेक राजेंद्र जगताप, उदय ववले आदी उपस्थित होते.
पिंपळे गुरवमध्ये पहाटेच्या गारव्यातही गीतांनी सभागृह झाले अक्षरशः चिंब
कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळी पहाटचे आयोजन
New Delhi
clear sky
42.9
°
C
42.9
°
42.9
°
36 %
0.7kmh
0 %
Sun
45
°
Mon
43
°
Tue
43
°
Wed
45
°
Thu
42
°