29.1 C
New Delhi
Thursday, April 30, 2026
Homeमनोरंजनपुणे कॉमिक कॉनमध्ये चाहत्यांच्या उत्साहाला उधाण, पॉप संस्कृतीच्या प्रेमींसाठी अनोखी पर्वणी

पुणे कॉमिक कॉनमध्ये चाहत्यांच्या उत्साहाला उधाण, पॉप संस्कृतीच्या प्रेमींसाठी अनोखी पर्वणी

पुणे, -.. मारुती सुझुकी अॅरेना प्रस्तुत आणि क्रंचीरोलचे पाठबळ असलेल्या बहुप्रतिक्षित पुणे कॉमिक कॉन २०२६ चा पहिला दिवस शनिवारी मेफिल्ड यश गार्डन येथे मोठ्या उत्साहात सुरू झाला. वीकेंडच्या निमित्ताने २१ आणि २२ मार्च रोजी रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या उद्घाटन दिवशी प्रचंड गर्दी झाली. कॉमिक्स, ॲनिमे, गेमिंग आणि पॉप कल्चरशी संबंधित सर्व गोष्टींचा आनंद साजरा करण्यासाठी चाहत्यांनी कार्यक्रमस्थळी गर्दी केली. त्यातून एका अविस्मरणीय वीकेंडची सुरुवात झाली.

कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या दिवशी चाहत्यांनी विशेष अशा “क्रिएटर्स अक्रॉस बॉर्डर्स” या सेगमेंटमध्ये जागतिक कॉमिक क्रिएटर जोश ब्लेलॉक यांच्याशी उत्साहाने संवाद साधला. भारतीय क्रिएटर्सच्या सत्रांमध्ये, तसेच पुणे ॲनिमे कम्युनिटीने आयोजित केलेल्या संवादात्मक सत्रांमध्येही चाहत्यांचा मोठा सहभाग दिसून आला.

कॉमिक कॉनमध्ये पहिल्या दिवशी मनोरंजन आणि प्रतिभेने संपन्न असे दमदार कार्यक्रम सादर झाले. यात स्टँड-अप कॉमेडियन सिद्धार्थ शेट्टीने आपल्या मार्मिक निरीक्षणात्मक विनोदाने आणि मंचावरील सहज वावराने प्रेक्षकांना खळखळून हसवले. कुमार वरुण याने ‘क्विझिंग विथ केव्ही’ या कार्यक्रमात आपल्या खास विनोदबुद्धीने सामान्य ज्ञान, विनोद आणि प्रेक्षकांशी उत्साही संवाद यांचा एक ऊर्जापूर्ण मिलाफ सादर केला.

मारुती सुझुकी एरिना प्रस्तुत आणि क्रंचीरोलचे समर्थन असलेल्या बहुप्रतिक्षित पुणे कॉमिक कॉन २०२६ च्या पहिल्या दिवसाची सुरुवात शनिवारी मेफिल्ड यश गार्डन येथे मोठ्या उत्साहात झाली. २१ आणि २२ मार्च रोजी वीकेंडला आयोजित या कार्यक्रमाच्या उद्घाटन दिवशी प्रचंड गर्दी झाली. कॉमिक्स, ॲनिमे, गेमिंग आणि पॉप कल्चरशी संबंधित सर्व गोष्टींचा आनंद साजरा करण्यासाठी चाहत्यांनी कार्यक्रमस्थळी गर्दी केली, ज्यामुळे एका अविस्मरणीय वीकेंडची सुरुवात झाली.

उद्घाटन दिवशी, चाहत्यांनी विशेष “क्रिएटर्स अक्रॉस बॉर्डर्स” या सेगमेंटमध्ये जागतिक कॉमिक क्रिएटर जोश ब्लेलॉक यांच्याशी उत्साहाने संवाद साधला. भारतीय क्रिएटर्सच्या सत्रांमध्ये, तसेच पुणे ॲनिमे कम्युनिटीने आयोजित केलेल्या संवादात्मक सत्रांमध्येही चाहत्यांचा मोठा सहभाग होता.

पहिल्या दिवशी मनोरंजन आणि प्रतिभेचा एक दमदार कार्यक्रम सादर झाला. स्टँड-अप कॉमेडियन सिद्धार्थ शेट्टीने आपल्या मार्मिक निरीक्षणात्मक विनोदाने आणि सहज मंचीय उपस्थितीने प्रेक्षकांना खळखळून हसवले, तर कुमार वरुणने ‘क्विझिंग विथ केव्ही’मध्ये आपल्या खास विनोदबुद्धीने सामान्य ज्ञान, विनोद आणि प्रेक्षकांशी उत्साही संवाद यांचा एक ऊर्जापूर्ण मिलाफ सादर केला.

पुणे आवृत्तीमध्ये विविध प्रकारच्या आंतरसंवादात्मक अनुभव (इमर्सिव्ह एक्स्पीरियन्स) झोन्सचाही समावेश होता. आलेले लोक खेळांमध्ये तल्लीन झाल्यामुळे मारुती सुझुकी अॅरेनामध्ये प्रचंड लगबग होती. क्रंचीरोल बूथने खास तयार केलेल्या सेटअप्समुळे ॲनिमे चाहते आकर्षित होत होते. उपस्थितांनी एका अनोख्या व्हर्च्युअल स्पेस मिशनची वातावरण निर्मिती करणाऱ्या व्हीआर डोमच्या माध्यमातून साय-फाय मल्टीमीडिया अनुभवाचा मागोवा घेतला. तसेच, त्यांनी वॉर्नर ब्रदर्सने डिझाईन केलेल्या एस्केप रूमचा सामना केला आणि ‘द सुपर मारिओ गॅलेक्सी’ व ‘नायका’च्या इंटरॲक्टिव्ह इन्स्टॉलेशन्सचा आनंद घेतला. गेमिंग अॅरेनामध्येसुद्धा दिवसभर खचाखच गर्दी दिसून आली. यामधील उत्साही आणि ऊर्जापूर्ण वातावरणाचा चाहत्यांनी पुरेपूर आनंद लुटला.

चाहत्यांनी ‘चेनसॉ मॅन’मधील डेन्जी, ‘सोलो लेव्हलिंग’मधील शॅडो इग्रिस, ‘वन पीस’मधील झोरो, ‘मार्व्हल’मधील लोकी आणि अशा अनेक आवडत्या पात्रांची वेशभूषा करून रूपांतर केले. त्यामुळे कॉस्प्ले हे एक प्रमुख आकर्षण ठरले. दररोज ३०,००० रुपयांच्या रोख बक्षिस देणाऱ्या पुण्यातील सर्वात मोठ्या कॉस्प्ले स्पर्धेत ते उतरले आणि खऱ्या अर्थाने लक्षवेधक पद्धतीने चाहत्यांच्या प्रेमाला (फॅनडम्सला) जिवंत केले.

कॉमिक कॉन इंडियाच्या सीईओ शेफाली जॉन्सन म्हणाल्या, “पुण्यात एक विशेष ऊर्जा आहे आणि ती तुम्हाला सर्वत्र दिसून येते; कोरेगाव पार्कमध्ये कॉफी पीत गप्पा मारणाऱ्या लोकांपासून ते एफसी रोडजवळील विद्यार्थी आणि जुन्या शहरातील कला व नाट्य समुदायापर्यंत. चाहत्यांनी जेव्हा उत्तम प्रश्न विचारले, खूप विचार करून कॉस्प्ले केला आणि मनसोक्त आनंद लुटला तेव्हा त्यामधून ही ऊर्जा पहिल्याच दिवशी दिसून आली. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींचा आनंद साजरा करण्यासाठी शहरवासी कसे एकत्र येत आहे, हे आम्हाला आताच जाणवू लागले आहे आणि दुसऱ्या दिवशीही हेच अधिक पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

पहिल्याच दिवशी एक उच्च मापदंड स्थापित झाला असल्यामुळे, दुसऱ्या दिवशी आणखी उत्साह असण्याची अपेक्षा आहे. यामध्ये उपस्थितांना एका विशेष ‘क्रिएटर्स जॅम’ची अपेक्षा करता येईल, त्यामध्ये जोश ब्लेलॉक, सॅविओ मस्करेन्हास, अभिजीत किनी, सौमिन पटेल, विभा राव आणि अलाना विनायक हे कॉमिक निर्मितीच्या कला आणि कौशल्याबद्दल माहिती देतील.
गेमिंगचे शौकिनसुद्धा चाहत्यांसाठीच्या एका खास क्षणाचा अनुभव घेता येईल, कारण रॉयल चॅलेंज पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरच्या वतीने भारतातील आघाडीचे गेमिंग यूट्यूबर स्कॉट (तन्मय सिंग) यांना एका विशेष ‘मीट-अँड-ग्रीट’ कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या बूथवर ब्रँडचा ‘चॅलेंजर गेमिंग झोन’ देखील असून त्यामध्ये इमर्सिव्ह व्हीआर क्रिकेटचा अनुभव मिळेल.

आपल्या तल्लख विनोदबुद्धी आणि आत्मविश्वासपूर्ण मंचीय उपस्थितीसाठी ओळखल्या जाणाऱ्या स्टँड-अप कॉमेडियन फातिमा आयेशाच्या सादरीकरणाने हास्यकल्लोळ सुरूच राहील. तसेच, संगीतप्रेमी मुंबईतील उदयोन्मुख हिप-हॉप सेन्सेशन ९९साइडच्या दमदार परफॉर्मन्ससाठी सज्ज होऊ शकतात. त्याने एमटीव्ही हसल ४.० मध्ये फायनलिस्ट म्हणून राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
29.1 ° C
29.1 °
29.1 °
48 %
2.6kmh
20 %
Wed
31 °
Thu
39 °
Fri
39 °
Sat
42 °
Sun
42 °

Most Popular

Recent Comments