25.2 C
New Delhi
Thursday, April 24, 2025
Homeमनोरंजनप्रथमेश परब आणि शशांक शेंडेच्या नव्या लुकचा 'श्री गणेशा'

प्रथमेश परब आणि शशांक शेंडेच्या नव्या लुकचा ‘श्री गणेशा’

मोशन पोस्टर प्रदर्शनाने 'श्री गणेशा' चित्रपटाची घोषणा, २० डिसेंबरला होणार प्रदर्शित…

‘येड्यांची जत्रा’ तसेच ‘टकाटक’सारखे सुपरडुपर हिट चित्रपट बनवणारे मिलिंद झुंबर कवडे पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज घेऊन आले आहेत. निर्माते संजय माणिक भोसले आणि कांचन संजय भोसले यांची निर्मिती असलेल्या तसेच मिलिंद कवडेंच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या आगामी चित्रपटाची घोषणा मोशन पोस्टर प्रदर्शित करून करण्यात आली आहे. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांची मांदियाळी आणि त्यांची धमाल ‘श्री गणेशा’ या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याची जणू झलकच मोशन पोस्टरवर पाहायला मिळते. २० डिसेंबरला सर्वत्र रिलीज होणाऱ्या ‘श्री गणेशा’ या चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांना एक रोड ट्रीप चा परिपूर्ण फॅमिली एन्टरटेनर पाहायला मिळणार आहे.

एमएच-१२ सिने मीडियाने आऊट ऑफ द बॅाक्स फिल्म्सच्या सहयोगाने प्रस्तुत केलेला ‘श्री गणेशा’ हा चित्रपट म्हणजे एक धमाल रोड मुव्ही आहे. हास्य-विनोद, धमाल-मस्ती, नाट्यमय घडामोडी, रोमान्स आणि इमोशन्सची रोलर कोस्टर राईड असलेल्या या चित्रपटाची निर्मिती संजय माणिक भोसले आणि कांचन संजय भोसले यांनी केली आहे. लाफ्टर आणि मॅडनेसचा डबल धमाका असलेल्या या चित्रपटाच्या मोशन पोस्टरवर सुरुवातीला हिरवा साज लेऊन नटलेल्या निसर्गामधून जाणारा रस्ता आणि वर निरभ्र-निळं आकाश आहे. काळ्याकुट्ट डांबरी रस्त्यावर एक लाल रंगाची कार आहे. कारच्या पुढील बाजूला उजव्या बाजूला कुर्ता-पायजमा घातलेला, पिकलेली पण स्टायलिश दाढी-मिशी असलेला संजय नार्वेकर डावा हात बोनेटवर टेकून उभा आहे. डाव्या बाजूला आजवर कधीही न दिसलेल्या गेटअपमध्ये शशांक शेंडे उजवा हात बोनेटवर टेकून उभे आहेत. नेहमी वाढलेल्या दाढी-मिशीत दिसणाऱ्या शशांक यांचा या चित्रपटात क्लीन शेव्ह लुक रसिकांना नक्कीच आवडेल. कारच्या बोनेटवर बसलेला प्रथमेश परब आपल्या हटके लुकमुळे लक्ष वेधून घेतो. त्याच्या शेजारी चित्रपटाची नायिका मेघा शिंदे बसलेली आहे. हा चित्रपट म्हणजे धमाल रोड ट्रीपचा ‘श्री गणेशा’च असल्याचं सांगत मोशन पोस्टरवर शेवटी शीर्षक येतं. पोस्टरच्या तळाशी हा चित्रपट २० डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असल्याचं घोषित करण्यात आलं आहे.
प्रथमेशने आजवर नेहमीच विविधांगी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. त्याचा हा चित्रपटही वेगळ्या वाटेने जाणारा आहे. कायम लांबलचक केसांमध्ये दिसणाऱ्या प्रथमेशची बदललेली हेअर स्टाईल मोशन पोस्टरवर दिसते. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमेश आणि मिलिंद कवडे यांचं रियुनियन झालं आहे. ‘टकाटक’सारखा धमाल ब्लॅाकबस्टर देणारी ही जोडी पुन्हा एक नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाल्याचं मोशन पोस्टर पाहिल्यावर जाणवतं. टिपटॅाप शर्ट-पँट आणि विंचरलेले केस असा शशांक शेंडे यांचा लुकही रसिकांना नक्कीच आकर्षित करेल. बऱ्याचदा भाईगिरी करणारा संजय नार्वेकर या चित्रपटात काहीशा सोज्वळ भूमिकेत दिसणार असल्याचे संकेत मोशन पोस्टरवरून मिळतात. थोडक्यात काय तर मिलिंद कवडे यांचा हा चित्रपट मुख्य कलाकारांसाठी इमेज ब्रेकिंग ठरणार आहे.

‘श्री गणेशा’ या चित्रपटाची कथा मिलिंद कवडे यांची असून पटकथा मिलिंद यांनी संजय नवगिरे यांच्या साथीने लिहिली आहे. संवादलेखन संजय नवगिरे यांनी केलं आहे. गीतकार जय अत्रे आणि मंदार चोळकर यांनी लिहिलेल्या अर्थपूर्ण गीतांना सुमधूर संगीतसाज चढवण्याचं काम संगीतकार वरुण लिखते यांनी केलं आहे. पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांनी दिलं असून, संकलन गुरु पाटील यांनी केले आहे. सिनेमॅटोग्राफी डीओपी हजरत शेख वली यांनी केली आहे. अंकित चंदिरामानी यांचा सनशाईन स्टुडिओज हा चित्रपट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वितरीत करणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
25.2 ° C
25.2 °
25.2 °
5 %
2.1kmh
0 %
Thu
41 °
Fri
42 °
Sat
42 °
Sun
42 °
Mon
40 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!